शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या निलंबित लिपिकाची नैराश्यातून रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 12:52 IST

अधिकाऱ्यांवर नातेवाईकांचा आरोप

ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव : रेल्वे स्थानकावरील माल धक्क्यालगत मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणाची ओळख पटली असून पुष्पकांत भागवत पाटील (४०, रा. खोटेनगर) असे मयताचे नाव आहे. जामनेर पंचायत समितीमध्ये लिपीक असलेल्या पाटील यांनी अधिकाºयांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.दरम्यान, शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती, त्या वेळी नातेवाईकांनी जामनेरच्या गटविकास अधिकाºयांसह जि.प.मधील अधिकाºयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, पुष्पकांत पाटील हे गेल्या १५ वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कनिष्ठ लिपीक म्हणून कामाला होते. चार महिन्यांपूर्वी त्यांची जामनेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात बदली झाली. शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी वेळीवेळी मानसिक त्रास देणे व सायंकाळी उशीरापर्यंत कामावर थांबवून ठेवणे असा त्रास देत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या सोबतच गटशिक्षणाधिकाºयांनी पुष्पकांत पाटील यांच्याकडून ५ हजार रुपये उसनवारीने घेतले होते. मात्र ते पैसे परत न देता त्यांना मानसिक त्रास देणे सुरू केला होता असाही आरोपी मयताची पत्नी सविता पाटील यांनी केला. काहीही कारण नसताना पाटील यांना गेल्या दोन महिन्यांपासून निलंबित केले होते. त्यामुळे नैराश्य येऊन गेल्या आठवड्यापासून ते एकाकी राहत होते. या नैराश्यातून गुरूवारी ४ आॅक्टोबर रोजी दुपारी २ वाजता घरातून बाहेर पडले होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. त्यानंतर रेल्वे मालधक्क्याजवळ पश्चिम रेल्व लाईनच्या खंबा क्रमांक ३०३ /३१-३३ दरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला होता.पुष्पराज पाटील हे खोटे नगर येथे भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित बहिणी, चार वर्षाची मंजिरी आणि दोन वर्षाची हिरा अशा दोन मुली आणि असा परिवार आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगाव