शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मित्राच्या लग्नासाठी नंदुरबारहून आलेल्या तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:00 IST

नातेवाईकांना घातपाताचा संशय

जळगाव : मित्राच्या लग्नासाठी नंदुरबार येथून जळगावात आलेल्या दीपक भरत गावंडे (वय २६, मुळ रा. करमाड, ता.जामनेर, ह. मु. नंदुरबार) या तरुणाने हरिविठ्ठल नगरातील स्वत:च्या राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, दीपक हा आत्महत्या करणार नाही, हा घातपात आहे, असा संशय दीपक याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.झोक्याच्या दोरीने आवळला फास; इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणीनातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक याच्या घराच्या दरवाजाला आतून कडी लावलेली नव्हती. झोक्याच्या दोरीने फास आवळलेला असल्याने त्याची ही आत्महत्या नाही. हा घातपात आहे, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला, त्यामुळे जिल्हा रुग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदन करावे अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.आरटीओंच्या वाहनावर होता चालकदीपक हा आरटीओ निरीक्षकांच्या वाहनावर चालक म्हणून कामाला होता. मात्र काही दिवसापूर्वीच त्याने काम सोडले होते. नंदुरबार येथे महावितरण कंपनीत कंत्राटी पध्दतीने कार लावून तेथेच स्थायिक होणार होता. त्यासाठी त्याने शुक्रवारी शहरात जुन्या ४ कार बघितल्या. चालक असल्याने स्वत:ची कार घेऊन व्यवसाय करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. आईचा आक्रोश मन हेलावणारादीपक याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर आई, वडील व भाऊ दुपारी दीड वाजता जिल्हा रुग्णालयात पोहचले. यावेळी आई आशाबाई यांनी टाहो फोडला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थित असलेल्या महिलांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होते.मित्राच्या लग्नासाठी वाटप केल्या पत्रिकायाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दीपक याचा मित्र नवल याचे १८ डिसेंबर रोजी जळगावात लग्न आहे. त्यासाठी तो तीन दिवसापासून जळगावात आला होता. हरिविठ्ठल नगरात त्याचे स्वत:चे घर आहे. त्या घरात तो रहात होता.मोठा भाऊ नीलेश हा नंदुरबार येथे शिक्षक असल्याने पूर्ण कुटुंब नंदुरबारला स्थायिक झाले आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत मित्र नवल व दीपक या दोघांनी लग्नपत्रिकांचे वाटप केले. शनिवारी सकाळी शेजारचा मुलगा दीपक याच्याकडे घरी पाण्याचा पंप घ्यायला गेला असता त्याला दीपक गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला.दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक कांचन काळे, हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील, वासुदेव मोरे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तेथे डॉक्टरांनी दीपक याला मृत घोषीत केले.यंदा लग्नाचे नियोजनदीपक हा अविवाहित होता. यंदा लग्न करण्याचे नियोजन कुटुंबाने केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. शहरात मित्रांचा मोठा गोतावळा होता. वडील भरत देवराम गावंडे, आई आशाबाई व भाऊ निलेश हे नंदुरबारला स्थायिक झाले आहेत. करमाड, ता.जामनेर हे त्याचे मुळ गाव आहे. अनेक वर्षापासून ते जळगावातच स्थायिक होते. भाऊ निलेशच्या नोकरीच्या निमित्ताने कुटुंब आता नंदुरबारला स्थायिक झाले.

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगाव