जळगाव : शनिपेठ रिधुर वाड्यातील रहिवासी किरण बबनराव धुमाळ ( वय ५५) यांनी शुक्रवारी सायंकाळी रहात्या घरी छताला नायलॉनचा दोर बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. कामावर गेलेले कुटुंबिय सायंकाळी घरी परतल्यावर हा प्रकार लक्षात आला. शनिपेठ पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सायंकाळी किरण धुमाळ हे बाहेरून घरी आले. यावेळी घरात कोणीही नव्हते. त्यांची मुले व पत्नी हे कामासाठी बाहेर जातात. घरी आलेल्या किरण धुमाळ यांनी घराला आतून कडी लावून घेत पत्र्याच्या छताला असलेल्या लोखंडी रॉडला नायलॉनचा दोर बांधून गळफास घेतला. सायंकाळी मुले घरी आल्यावर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. मुलगा योगराज किरण धुमाळ (वय १९) याने याप्रकरणी तातडीने शनिपेठ पोलिसांना माहिती कळविली. त्यांच्या पश्चात २ मुले, एक मुलगी, पत्नी आहे.
जळगावात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 13:06 IST