शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव तालुक्यातील आसोद्याच्या विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 12:59 IST

जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी

ठळक मुद्देनातेवाईकांचा मन हेलावणारा आक्रोश अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव : तालुक्यातील आसोदा येथे नूरजहा असलम पिंजारी (वय-२१) या विवाहित महिलेने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९़३० वाजता उघडकीस आली़ जिल्हा रूग्णालयात दुपारी प्रचंड गर्दी झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, दीड वर्षापूर्वी नूरजहा यांचे असलम यांच्याशी विवाह झाले़ त्यांना सात महिन्याचा एक मुलगा आहे़ असलम हे मिस्तरी काम करून उदरनिर्वाह करायचे़ कामामुळे अनेक दिवस असलम हे बाहेर गावी राहत होते़ यात त्यांना दारूचे व्यसनही जडले़ मंगळवारी सकाळी नूरजहा ह्या पती असलम यांच्याशी फोनवर बोलत होत्या़ त्यानंतर घराच्या आतल्या खोलीत जाऊन त्यांनी अचानक ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला़ हा प्रकार कुटुंबातील इतर सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित नागरिकांच्या मदतीने नूरजहा यांना खाली उतरविले आणि जिल्हा रूग्णालयात नेले़ वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती नुरजहा यांना मृत घोषित केले़ घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अशोक रत्नपारखी पोलीस कर्मचाऱ्यांसह जिल्हा रूग्णालयात दाखल झाले होते़नातेवाईकांचा मन हेलावणारा आक्रोशघटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी देखील जिल्हा सामान्य रूग्णालयात धाव घेतली़ कुटूंबीयांनी मृत्यूची बातमी एकताच हंबरडा फोडला़ पोलिसांनी नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेतले़ दरम्यान, कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही़ मात्र, कौटुंबीक वादातून ही घटना घडली असावी असा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे़ नुरजहा यांचे माहेर भुसावळ येथील आहे़ दरम्यान, वरणगाव येथील आजी-आजोबांकडे त्यांचे संगोपन झाले़

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगाव