शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राधाकृष्णनगरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

फोटो : ११.२१ वाजेचा मेल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- शहरातील दूध फेडरेशन परिसरातील राधाकृष्णनगरात राहणा-या १८ वर्षीय ...

फोटो : ११.२१ वाजेचा मेल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव- शहरातील दूध फेडरेशन परिसरातील राधाकृष्णनगरात राहणा-या १८ वर्षीय दुर्गा शेखर गायकवाड या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, मुलीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली असून त्यानुसार रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

शहरातील राधाकृष्णनगरातील रहिवासी शेखर गायकवाड याचा दुर्गा हिच्याशी २३ डिसेंबर २०२० रोजी विवाह झाला होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास दुर्गाचे वडील मालवाहू रिक्षाचालक दत्तू पाटील (रा. प्रजापतनगर) यांना एका व्यक्तीचा फोन आला व तुमची मुलगी आजारी असल्याचे सांगितले. दत्तू पाटील हे भाऊ पुरुषोत्तम पाटील यांना सोबत घेऊन लागलीच मुलीचे घर गाठले. त्यावेळी त्यांना आपली मुलगी मयत स्थितीत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला.

सहायक पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह शहर पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक धनराज येरुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नातेवाइकांनी ही आत्महत्या नसून सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून दुर्गा हिने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

गुन्हा दाखल

सासरच्यांनी दुर्गा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला टोचून बोलून वारंवार शारीरिक, मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली, अशी तक्रार मयत विवाहितेच्या वडिलांनी शहर पोलिसात दिली. त्यानुसार, मयताचा पती शेखर गायकवाड, सासू वत्सलाबाई गायकवाड, सासरा भास्कर गायकवाड, जेठ मुकेश गायकवाड (सर्व रा. राधाकृष्णनगर) यांच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.