जळगाव : कौटुंबिक वादातून एका मातेने तीन मुलांसह गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे मंगळवारी दुपारी घडली. सरला सुभाष कोळी (२५), प्रियांका (६), पायल (अडीच वर्षे), कृष्णा (दीड वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी पारोळा पोलिसांनी पती सुभाषला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.तामसवाडी येथील असलेली विवाहिता सरला कोळी ही पती व चार मुलांसह न्यू प्लॉट, भास्करनगर येथे राहात होती.(प्रतिनिधी)
मातेची तीन मुलांसह आत्महत्या
By admin | Updated: February 22, 2017 04:32 IST