आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.९ : नवीन बसस्थानकातील झाडाला बागायतदार रुमालाने गळफास घेत एका ३५ वर्षीय अनोळखी प्रवाशाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ त्याच्या खिशात रांजणगाव ते नेवासा असे बसचे तिकीट आढळून आले़गांधी उद्यानाच्या मागील बाजूकडून बसस्थानकातील सुबाभळीच्या झाडाला हा इसम गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला़ कंट्रोलर मुकुंद पिंपळे यांना सांगितल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्यासह सहकाºयांनी घटनास्थळ गाठले़ मयताच्या उजव्या हातावर इसाराम शिवराम सागरी असे नाव गोंधले आहे़ त्याच्या खिशात बिड्या, तंबाखूची पुडी तसेच चुरगळलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या़ तसेच रांजणगाव ते नेवासा असे तिकीट आढळून आले़ तिकिटावरील वेळेनुसार सकाळी ९ वाजेच्या सुमारास तो रांजणगाव येथून निघाला असल्याचे समजते़
जळगाव बसस्थानकात प्रवाशाची झाडाला गळफास घेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 12:36 IST
नवीन बसस्थानकातील झाडाला बागायतदार रुमालाने गळफास घेत एका ३५ वर्षीय अनोळखी प्रवाशाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली़
जळगाव बसस्थानकात प्रवाशाची झाडाला गळफास घेत आत्महत्या
ठळक मुद्देमयताच्या हातावर गोंधले आहे इसाराम सागरीबसस्थानकात सुबाभळीच्या झाडाला घेतला गळफासखिशात आढळले रांजणगाव ते नेवासा तिकिट