आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१६ : राष्टÑीय महामार्गाला लागून असलेल्या मयूर कॉलनीतील इंद्रनील सोसायटीत राहणारे बिल्डर अजय ओंकार पाटील (वय ५३, मूळ रा.पिळोदा, ता. शिरपूर, जि. धुळे) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजता घडली.कर्जाला कंटाळूनच त्यांनी हा निर्णय घेतल्याची शक्यता जवळच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. आत्महत्येचे वृत्त कळताच नातेवाईक व शेजाºयांनी घटनास्थळी धाव घेतली व कुटुंबीयांचे सांत्वन केले. अजय पाटील यांचा पुणे येथे गेलेला मुलगाही सायंकाळी जळगावात पोहचला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अजय पाटील हे पत्नी ज्योती,मुलगा परेश व मुलगी ऐश्वर्या यांच्यासह मयूर कॉलनीतील इंद्रनील सोसायटीत वास्तव्याला आहेत. मुलगा परेश हा काही दिवसांपूर्वी पुणे येथे गेलेला आहे. गुरुवारी सकाळी मुलगी शाळेत गेलेली होती, त्यामुळे घरी पत्नी व अजय पाटील असे दोघेच होते.सकाळी पावणेनऊ वाजता पत्नीला चहा बनविण्याचे सांगून ते वरच्या मजल्यावर गेले. चहा तयार झाल्यानंतर पत्नी वरच्या मजल्यावर गेली असता अजय पाटील यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहताच पत्नीने किंचाळी मारून पतीला मिठी मारली. शेजारील लोकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना एका खासगी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्यांना अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले. दिवसभर मृत्यूशी झूंज दिल्यानंतर रात्री नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
जळगावात कर्जाला कंटाळून बिल्डरची गळफास घेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 12:59 IST
जळगावात दिवसभरातील उपचारानंतर रात्री ९ वाजेला झाला मृत्यू
जळगावात कर्जाला कंटाळून बिल्डरची गळफास घेत आत्महत्या
ठळक मुद्देकर्जाला कंटाळून घेतला आत्महत्येचा निर्णयदिवसभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रात्री प्राणज्योत मालवलीपत्नी चहा देण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्यानंतर लक्षात आली घटना