शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात कोरोनावर यशस्वी मात, किती जण झाले बरे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 12:29 IST

दिलासादायक चित्र

जळगाव : जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक सुमारे २०० च्या टप्प्यात सातत्याने वाढत असतानाही बरे होणाऱ्यांचे प्रमाणही गेल्या आठवडाभरात वाढले आहे़ या कालावधीत ९१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण रुग्णांपैकी ३५ टक्के रुग्ण उपचार घेत असून ५९ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत़जिल्ह्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे होणाºयांचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक होत आहे़ काही दिवसांपूर्वी एका ९० वर्षीय वृद्धांनीही कोरोनावर यशस्वी मात केली होती़ त्यामुळे कोरोना हा बरा होणारा आजार असून लवकर रुग्णालयात गेल्यास यातून रुग्ण बाहेर पडू शकतो, अशी जिल्हाभरात ३३८३ उदाहरणे आहेत़मृत्यूदर साडेपाच टक्क्यांवरजिल्ह्याचा मृत्यूदर हा थेट १२ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता़ मध्यंतरीच्या काळात चाचण्या वाढविण्यात आल्या व रुग्णसंख्या समोर येत गेल्याने हा मृत्यूदर ५.६ टक्क्यांवर आला आहे़ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे़७५ टक्के निगेटिव्हज्या चाचण्या रोज होत आहेत़ त्यापैकी जवळपास ७५ टक्के अहवाल हे निगेटीव्ह येत आहेत, त्यामुळे हे देखील एक दिलासादायक चित्र आहे़७० टक्के रुग्णांना सौम्य लक्षणेज्यांना लक्षणे नाहीत किंवा अगदी सौम्य लक्षणे आहेत त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते़ सद्यस्थितीत उपचार घेणाºया रुग्णांपैकी १४२४ म्हणजेच ७० टक्के रुग्णांना कसलीही लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत. तर त्या खालोखाल १२७ रुग्णांना मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत तर ४६९ रुग्णांना आॅक्सिजनची गरज भासत आहे़ २२० रुग्ण अत्यवस्थ आहेत़लवकर चाचणी, लवकर निदान व लवकर उपचार यामुळे आता पुढील गंभीर बाबी टाळता येत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत गेलेले आहे़ यामुळे मृत्यूचे प्रमाणही घटले आहे़ शिवाय लवकर हे लोक आयसोलेट झाल्याने पुढील वाढणारा संसर्गही आटोक्यात आला येणार आहे़ रोज चाचण्यांचे प्रमाण वाढले आहेत़ त्यात जास्त अहवाल निगेटीव्ह असून काही पॉझिटीव्ह येत आहेत, मात्र, लवकर निदान होत असल्याने पुढील संसर्ग टळत आहे़- डॉ़ एऩ एस़ चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव