शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कपाशी वेचणाऱ्या हातात ‘नीट’ परीक्षेचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 17:38 IST

काळ्या मातीत राबणाºया या गुणवंताचे नाव आहे, संकेत बाबूलाल महाजन. तो मूळ राहणारा पोहरे येथील. त्याच्या यशाचे चाळीसगाव पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

ठळक मुद्देचाळीसगावच्या संकेतला महाजनला पहिल्याच प्रयत्नात ५९४ गुणअभ्यासातल्या सातत्याने यशाला गवसणी

चाळीसगाव : कपाशी वेचताना त्याच्या डोळ्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न फुलत होते. झालेही तसेच. कपाशीची वेचणी करतानाच त्याला नॅशनल इलिजिबीटी कम इंट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षेचा निकाल समजला. पहिल्याच प्रयत्नात ५९४ गुण मिळवत त्याने वैद्यकीय शिक्षणाचा दरवाजाच उघडून घेतला आहे. काळ्या मातीत राबणाºया या गुणवंताचे नाव आहे, संकेत बाबूलाल महाजन. तो मूळ राहणारा पोहरे येथील. त्याच्या यशाचे चाळीसगाव पंचक्रोशीत कौतुक होत आहे. शेतकरी आई-वडिलांच्या डोळ्यात लेकाच्या यशाने आनंदाचे भरते आले आहे.संकेत महाजन हा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित के.आर.कोतकर ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी. बारावीच्या परीक्षेतही शेती कामात खंड न पाडता त्याने महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. आपल्याला डॉक्टर व्हायचेच. हा ध्यास त्याने मन पटलावर जणू गोंधून घेतला होता.कोणतेही महागडे क्लासेस न लावता आणि त्यासाठी परजिल्ह्यात न जाता संकेतने चाळीसगावी राहणारे त्याचे शिक्षक असणारे काका मुकुंद सदा महाजन यांच्याकडे राहून नीट परीक्षेत यशाला गवसणी घातली. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून टाळेबंदीच्या काळातही त्याचे शेतीत राबणे सुरुच होते. अभ्यासात सातत्य राखल्यानेच यश मिळाल्याचे तो सांगतो. मोबाईलपासून स्वत:ला दोन वर्षांपासून लांब ठेवल्याने अभ्यासात गुंतवून घेतले. त्याचा फायदाच झाला. यामुळे पहिल्या प्रयत्नातच आपण यशस्वी झालो. आपल्या यशाचे गमक तो अशा शब्दात सांगतो. मुलाच्या यशाने आई-वडिलांसह काका-काकूही आनंदून गेले आहे. मुलाने आमच्या मातीतल्या कष्टाचे पांग फेडले, अशी प्रतिक्रिया संकेतची आई प्रतिभा व वडिल बाबूलाल यांनी व्यक्त केली. संकेतला नीट परीक्षेसाठी येथील प्रा.श्रीकांत मोरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.दरदिवशी सहा ते सात अभ्यास, शंकांचे निरसन आणि सातत्य याबळावरच नीट परिक्षेत यशाची मोहोर कोरली. माझी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बाहेरगावी जावून क्लासेस लावू शकलो नाही. चाळीसगावी राहूनच अभ्यास केला. जिद्द आणि ध्येयावरचा फोकस अढळ ठेवला तर यश हमखास मिळतेच.- संकेत बाबूलाल महाजन, चाळीसगाव

टॅग्स :SchoolशाळाChalisgaonचाळीसगाव