लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- महाराष्ट्र राज्यातील विधी शाखेच्या सीईटी (स्टेट कॉमन एन्ट्रंन्स टेस्ट) परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात जळगाव शहरातील कबीर वासंती शेखर यांनी यश संपादन केले आहे. या परिक्षेस बसलेल्या ४३ हजार ४७९ विद्यार्थ्यांमधून कबीर यांनी गुणवत्ता यादीत पंधरावा क्रमांक मिळवला आहे.
-----------
छाया सारस्वत यांची नियुक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - भाजपा मंडळ क्रमांक ५ मध्ये महिला आघाडीच्या अध्यक्षपदावर छाया सारस्वत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीबद्दल मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी शक्ती महाजन, रेखा कुळकर्णी, नितूताई परदेसी, शोभा कुळकर्णी, विद्या सोनवणे, योगेश गोसावी,ऊमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
०००००००००००००००००००
फोटो- ०४ सीटीआर ४२
नतालिन फर्नांडिस यांना पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव-महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदतर्फे सेंट जोसेफ कॉन्व्हेंट सिनीयर सेकेंडरी शाळेच्या शिक्षिका नतालिन फर्नांडिस यांना तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाळेच्या व्यवस्थापक सिस्टर मारी, प्राचार्या सिस्टर मर्टल आदींनी अभिनंदन केले.