शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून करून घेतला जातोय अभ्यास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:44 IST

आरोग्याची काळजी घ्या, शिक्षक करीत आहेत सूचना

जळगाव : कोरोना व्हायरसने जगासह देशभरात धुमाकूळ घातलाय. या पार्श्वभुमीवर सर्व शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी दिली आहे़ तर शाळांची परीक्षाही रद्द केली़ कोरोनाच्या भयग्रस्त वातावरणातही शाळांकडून विद्यार्थ्यांचे हित जोपासले जात आहे़ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, म्हणून अनेक शाळा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नियमित संपर्कात राहून त्यांच्याकडून अभ्यास करून घेत आहेत. त्यामुळे दररोज विद्यार्थ्यांनी आॅनलाइन शाळा भरू लागली आहे़मार्च महिन्याच्या अखेरीस शाळांच्या परीक्षा प्रारंभ होणार होत्या़ पण, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी तरी जाहीर केली़प्राथमिक शाळांच्या परीक्षाही रद्द केल्या़ विद्यार्थी अभ्यासात मागे पडू नये, यासाठी जिल्ह्यातील अनेक शाळांनी पालकांचा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे़ त्यात दररोज शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडून कुठल्या विषयाचा अभ्यास करून घ्यावयाचा आहे, त्याबाबत सूचना केल्या जात आहेत़ त्यामुळे एकीकडे देश कोरोनावर मात करण्यासाठी लढतोय तर दुसरीकडे याच देशाचे भविष्य घडविणारे विद्यार्थी आपल्या शिक्षणात खंड पडु नये यासाठी तंत्रज्ञानाची जोड घेऊन आॅनलाईन शिक्षण घेत आहेत. हीच जिद्द पुढील काळात या मुलांना यशस्वी शिखरावर जाण्यासाठी मदत करणार आहे.शिक्षक पाठवित आहेत व्हिडीओ, नोटस्, प्रश्नसंचविद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण घरी बसून मिळावे म्हणून विविध व्हिडीओ, गृहपाठाचे प्रश्न पाठविले जात आहेत़ त्याचबरोबर विषयनिहाय अभ्यास कसा घ्यावा, याबाबत ग्रुपवरून पालकांना सूचना केल्या जात आहे़ सुट्टीच्या काळात पालकांनी पाल्यांची काळजी घेवून अधिकाअधिक वेळ त्यांच्यासोबल घालविण्याचेही आवाहन केले आहे़ विद्यार्थ्यांनीही पालकांसोबत ग्रंथ, पुस्तके तसेच भगवतगीता वाचन करावे,असेळी शाळांनी सूचना दिल्या आहेत़ दुसरीकडे महाविद्यालयांमधील प्राध्यापकांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापन केले जात आहे़ तर ग्रुपवर नोट्स आणि प्रश्नसंच पाठवून ते घरी सोडून परीक्षा काळासाठी आवश्यक अभ्यास करून घेतले जात आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव