ते बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स कॉलेज चाळीसगाव महाविद्यालयात फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय वेबीनारमध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर होते. याप्रसंगी डॉ. नरवाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, देश-विदेशातील स्कॉलरशिप कशाप्रकारे मिळवता येतील व त्या करिता काय तयारी करावी लागते. तसेच आपल्याजवळ असलेल्या स्मार्ट फोनवरून गुगल फेसबुकचा वापर वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या शोधण्यासाठी करावा, यासाठी इंग्रजी भाषेवर आपले प्रभुत्व असणे आवश्यक आहे. हे सांगून त्यांनी पासपोर्ट व व्हिसा कसा काढायचा याबद्दलही सविस्तर मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विभागप्रमुख आर. व्ही. जोशी यांनी केले. सूत्रसंचालन डी. एल. वसईकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय टी. व्ही. माळी यांनी करून दिला. तसेच आभार प्रा. पंकज वाघमारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॅ. राहुल कुलकर्णी, सलमान पठाण तसेच शिक्षकेतर कर्मचारी भूषण जोशी, श्रीकांत बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.