शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

विद्यार्थ्यांना तंबाखूपासून रोखणे गरजेचे - डॉ़ सचिन परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:07 IST

ब्रह्मकुमारीजतर्फे २१ राज्यांमध्ये मोहीम

आनंद सुरवाडे एका सर्व्हेक्षणानुसार दररोज साडेपाच हजार विद्यार्थी तंबाखू सेवनाला सुरूवात करतात, ही धक्कादायक व तेवढीच धोकादायक माहिती आहे़ १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांना जर तंबाखूपासून रोखले तर ते कसल्याच व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत, त्यामुळे ब्रम्हकुमारीजतर्फे प्रतिबंधात्मक उपायांवर अधिक भर दिला जात आहे, अशी माहिती ब्रह्मकुमारीजचे राजयोग शिक्षण व शोध प्रतिष्ठानचे वैद्यकिय प्रभागाचे समन्वयक डॉ़ सचिन परब यांनी दिली़ आरोग्य सल्लागार तथा तंबाखूमुक्तीसाठी देशभर मोहीम राबविणारे डॉ़ सचिन परब हे दोन दिवस जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.प्रश्न : व्यसनमुक्तीबाबत काय संकल्प ब्रह्मकुमारीजने केला आहे?उत्तर : महाराष्ट्रात १ लाख १० हजार शाळा आहेत या शाळांना तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प हाती घेतला आहे़ सर्व सेवा या मोफत दिल्या जातात़ ज्यांना व्यसन आहे त्यांना सोडायचे असेल तर आम्ही आवाहन करतो़ तंबाखू ही कुठल्याही व्यसनाची सुरूवात आहे, त्यामुळे त्यालाच जर प्रतिबंध केला तर सर्व पुढील व्यसने टाळता येऊ शकतात़ सर्व मुले व्यसनमुक्त असावीत हा आमचा संकल्प आहे़ आम्ही सकारात्मकतेने विद्यार्थ्यांना ते पटवून देतो़प्रश्न : तंबाखूमुक्त अभियानासाठी काय उपाय केले जातात?उत्तर : विद्यार्थ्यांच्या मनावर नेहमी चुकीच्या गोष्टी बिंबवल्या जातात ते त्याचे लवकर अनुकरण करतात़ सध्याची पिढी ही सोशल मीडियाने संमोहित झालेली आहे़ त्यामुळे सैराट मेंदू ही संकल्पना अधिक दृढ होत असून त्यांचे स्वत:वरील नियंत्रण हरवत चालले आहे़ भरटकणाऱ्या मुलांना हेरणारी लोक आसपास असतात ते अशा मुलांना हेरून ड्रग्जच्या आहारी जायला भाग पाडतात व नंतर विकायला ही मोठी लॉबी कार्यरत आहे. मॅवमॅव या ड्रग्जने तर धुमाकूळ घातला होता़ व्यसनी लोक वाईट नसतात ते आजारी असतात त्यांना औषधाची आवश्यकता असते, त्या दृष्टीनेच त्यांच्याशी वागले पाहिजे़ सध्या लोकांमधील सहनशिलता संपली आहे़ छोट्या गोष्टीवरून आत्महत्या करणे, हत्या करणे हे प्रकार नित्याचेच झाले आहे़ रागावर नियंत्रण राहिलेले नाही, हे थांबवून शांतात प्रस्थापीत करायची आहे़ सध्या लोक मोबाईलच्या ऐवढे आहारी गेलेले आहेत की मुंबईत मानसोपचारतज्ञांकडे किमान पंधरा लोक हे रोज मोबाईल सोडवा अशी मागणी करीत येत असतात़ त्यांना मानसीक आजार जडल्याचे नंतर लक्षात येते़ मुलांच्या बाबतीत पालक व शिक्षक दोघांची जबाबदारी आहे.आत्मा शब्दाचा आपण नवीन अर्थ लावला आहे... तो कसा?आत्मा, सोल म्हणजे काय याचा शोध घेण्यासाठी मी सोल हा शब्द लिहिला व त्याकडे बराच वेळ पाहत राहिलो़ तेव्हा मला असंख्य अर्थ दिसले़ त्यातील सोर्स आॅफ युनिक लाईट व सोर्स आॅफ अल्टीमेट लिव्हींग हे दोन अर्थ अधिक संयुक्तिक वाटतात़ या नावाने माझा शोही जगभर प्रसिद्ध झाला़ यासह १८० देशात राबविण्यात येणाºया तंबाखूमुक्त मोहीमेला मी गिता हे नाव दिले अर्थात ग्लोबल इनिशिएटीव्ह आॅफ टोबॅको अवेअरनेस़आपण ब्रह्मकुमारीजकडे कसे आलात?आपण आधी नास्तिक होतो़ कोकणी असल्याने मासे असल्याशिवाय जेवण नसायचे. मात्र एकवेळा माऊंट अबुला सहज फिरायला गेलो़ तेथील श्रीकृष्णांचा फोटो बघितला व तो बघतच राहिलो, पहिल्यांदा आल्यावर पण वाटले आपण या ठिकाणी आधी येऊ गेलेलो आहे़ वारंवार तसंच वाटत होते व त्याच क्षणाला बदल झाला व ठरवल की दुसऱ्यांच्या मदतीसाठी जगायचं़ विश्वात बसत नव्हता पण टाळूही शकत नव्हतो़ मी फक्त एक निमित्त आहे़ कुणीतरी हे चांगली कामे करवून घेत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव