शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मुक्कामी मांडळ बस बंद केल्याने विद्यार्थ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 15:40 IST

अमळनेर तालुक्यातील बस जळीत प्रकरणानंतर दोन दिवस बस गेलीच नाही

अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील मांडळ येथे बस जाळण्याच्या घटनेमुळे दोन दिवस मांडळ बस गेलीच नाही, तर मुक्कामी बस बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच मंगरूळ मार्गे जवखेडा बसच्या सहा फेऱ्या रद्द केल्यानेही विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.गेल्या आठवड्यात मांडळ येथे अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास बस जाळल्याने एस. टी. महामंडळाने दोन दिवस मांडळ बस बंद ठेवली. यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले. अमळनेर शहरापासून २२ कि.मी. अंतरावर पश्चिमेला पांझरा नदी काठी मांडळ गाव असून, गावाची लोकसंख्या १३ हजार आहे. हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. धुळे, शिंदखेडा या तालुक्याच्या सीमेलगत हे गाव आहे. गावातील सुमारे ३०० विद्यार्थी शिक्षणासाठी अमळनेरला ये-जा करत असतात.याव्यतिरिक्त नोकरी करणारे आणि बाजारासाठी, तालुक्यातील कृषी, प्रांत कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय आदी ठिकाणी ग्रामस्थांचे येणे-जाणे असल्याने दररोज एस. टी. बसची आवश्यकता आहे. दिवसभरात मांडळ गावाला एसटीच्या १२ फेºया होत होत्या. गेल्या शनिवारी पहाटे दीड वाजता अज्ञात व्यक्तीने एस टी पेटवून नुकसान केले. सुदैवाने आग विझवण्यात गावकºयांना यश आले अन्यथा परिसरात हॉटेल, दुकाने असल्याने त्या ठिकाणी असलेले गॅस सिलिंडर पेटले असते तर अनर्थ घडला असता. मात्र एस. टी.चे नुकसान झाल्याने एस. टी. महामंडळाने दोन दिवस मांडळ गावची बस बंद केली होती.संतप्त ग्रामस्थांनी याबाबत अमळनेर आगारात जाब विचारला असता वाहक व चालक यांनीही सामूहिक निर्णय घेऊन मांडळ येथे बस न्यायची नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी ग्रामस्थ नि एका माथेफिरूच्या कृत्यामुळे संपूर्ण गावाला वेठीस धरू नये अन्यथा गावकरी आक्रमक भूमिका घेतील असे सांगितल्यानंतर विभाग नियंत्रकांनी मांडळ बस फेºया सुरू करण्याचे आदेश दिले तरी चालक व वाहक यांनी एसटीच्या नुकसानीस जबाबदार कोण म्हणत बस जाऊ देण्यास नकार दिला होता, मात्र आगारप्रमुखांनी दुपारी १२ वाजेपासून बस सुरू केली, परंतु रात्री मुक्कामी बस बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवल्याने रात्री उशिरा परतणाºया प्रवाशांचे हाल होणार आहेत तर सकाळी पहिल्या गाडीने शाळा महाविद्यालयात येणाºया विद्यार्थ्यांचेही हाल होणार आहेत.बस जळीत प्रकरणी सीआयडी चौकशीदरम्यान, मांडळ बस जळीत प्रकरणाची सीआयडीने दखल घेतली असून, अधिकारी घटनास्थळी येऊन गोपनीय चौकशी करून गेले आहेत व राख आणि एसटीचा पत्रा नमुना फॉरेन्सिक प्रयोग शाळेत तपासण्यासाठी घेऊन गेले आहेत. अज्ञात आरोपीचा अद्याप तपास लागला नसल्याचे मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.विभाग नियंत्रकांच्या आदेशाने मांडळ बस बंद करण्यात आली होती आणि त्यांच्याच आदेशाने सुरू करण्यात आली आहे. मुक्कामी गाडी बंद करून विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय होणार नाही. अशा वेळेला गाडी सोडण्यात येईल.- संजय बाविस्कर, आगार व्यवस्थापक, अमळनेर

टॅग्स :Crimeगुन्हाAmalnerअमळनेर