शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी तयार केले स्वयंअध्ययनासाठी गणित साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 17:35 IST

अमळनेर येथील साने गुरुजी नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम

अमळनेर, जि.जळगाव : शहरातील सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनासाठी गणिताचे साहित्य तयार केले आहे. अभ्यासक्रमात झालेल्या बदलामुळे प्रात्यक्षिक किंवा कृती हा विषय आता कार्यानुुभव किंवा चित्रकला यापुरता मर्यादित न राहता गणित विषयातसुद्धा मुले साहित्य बनवू लागली आहेत. विद्यार्थ्यांना स्वंअध्ययनासाठी त्याचा उपयोग होऊ लागला आहे.कृतीयुक्त अभ्यासक्रम तयार झाल्याने ज्ञानरचनावादावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे मुले स्वत: साहित्य बनवून त्याचा पडताळा घेऊ लागली आहेत. सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणित शिक्षक डी.ए.धनगर यांच्या मदतीने कमी खर्चात वर्र्र्कींग मॉडेल तयार केले. या उपकरणांच्या साहाय्याने दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका यांच्यामुळे तयार होणारे कोन, संगत कोन, आंतर कोन, बाह्य व आंतर व्युत्क्रम कोन, रेषीय जोडीतील कोन, विरुद्ध कोन, तसेच रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज १८० अंश असते हे सहजपणे दाखवता येते. समांतर रेषातील आंतरकोनांच्या मापांची बेरीज १८० अंश असते. व्युत्क्रम कोन एकरुप असतात. दोन रेषा समांतर असतील तर छेदिकेमुळे तयार झालेले संगत कोन एकरुप असतात. हे आणि इतर संकल्पना प्रात्याक्षिकाद्वारे विद्यार्थी सहज दाखवतात.या उपक्रमातील सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक संस्था सचिव संदीप घोरपडे, संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस.डी.देशमुख व सर्व शिक्षकांनी केले.

टॅग्स :Educationशिक्षणAmalnerअमळनेर