शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

बेंडाळे महाविद्यालयात ठिय्या : निकृष्ट जेवण मिळत असल्याने विद्यार्थिनींचे ‘अन्नत्याग’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 13:07 IST

बाहेरून डबा आणण्यास मुभा

जळगाव : कधी अळ्या तर कधी खडे़़़ सोमवारी तर जेवणाच्या डब्ब्यात चक्क केस निघाला़ त्यामुळे वारंवार खानावळीतून निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने संतप्त झालेल्या डॉ़ जी़डी़बेंडाळे महाविद्यालयाच्या वसतिगृहातील काही विद्यार्थिंनींनी अन्नत्याग आंदोलन करीत बाहेरून जेवणाचा डब्बा आणण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी केली़ शेवटी बाहेरून डब्बा आणण्याची परवानगी देण्यात आली.डॉ़ बेंडाळे महाविद्यालयाच्या आवारात प्रवीण चावला याची ओम साई कॅन्टीन आहे़ ते खानावळहीसुध्दा चालवितात. दरम्यान, वसतिगृहातील विद्यार्थिनी या खानावळीतून जेवणाचा डबा घेतात़ मात्र, काही वेळा जेवणात अळ्या तसेच खडे निघत असल्यामुळे विद्यार्थिनींनी तक्रारी केल्या होत्या़ त्यानंतर सोमवारी एका विद्यार्थिनीच्या ताटात केस निघाल्यामुळे विद्यार्थिनींनी थेट खानावळ चालक चावला यांच्याकडे जावून जेवणाबाबत तक्रार केली़ अखेर काही न काही जेवणात निघत असल्यामुळे विद्यार्थिनींनी कॅन्टीनच्या आवारात ठिय्या मांडला आणि बाहेरून जेवण आणण्याची मुभा द्यावी, तसेच खानावळ चालक बदलण्यात यावा, अशी मागणी केली. अखेर संस्थाध्यक्ष डॉ़ सुभाष चौधरी यांच्यासह महाविद्यालयाचे कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींची भेट घेतली़ विद्यार्थिनींनी डॉ़ चौधरी यांच्याकडे संपूर्ण समस्या मांडली़ त्यांनी त्वरित या तक्रारीची दखल घेवून तात्काळ सुधारणा करण्यात येईल, असे सांगितले तसेच बाहेरून डबा आणण्याची मुभा देण्यात आली़या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे लेवा एज्युकेशन युनियचे अध्यक्ष डॉ़सुभाष चौधरी यांनी सांगितले़४ भरलेले तर १७ रिकामे२१ पैकी ४ सिलेंडर हे गॅसने भरलेले होते तर १७ सिलेंडर हे रिकामे होते़ मात्र, व्यावसायासाठी कमर्शियल सिलेंडरला परवानगी असताना घरगुती वापराचे सिलेंडर आढळून आल्याने पुरवठा अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आला़ तसेच गॅस कनेकश्नचे कार्ड देखील न मिळाल्याने मंगळवारी कार्डची संपूर्ण तपासणी व चौकशी जाणार आहे़ कॅन्टीन चालक दोषी आढळून आल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्यानुसार कलम ३ आणि ७ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेसुर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़तब्बल २१ घरगुती वापराचे सापडले सिलेंडरबेंडाळे महाविद्यालयातील ओम साई कॅन्टीमध्ये कमर्शियल सिलेंडरचे नव्हे तर घरगुती वापराचे सिलेंडरचा वापर होत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांना मिळाली़ त्यांनी पथकासह सोमवारी सायंकाळी ७ वाजता कॅन्टीमध्ये छापा मारला असता तब्बल २१ घरगुती सिलेंडर तपासणीत आढळून आले़

टॅग्स :Jalgaonजळगाव