शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे मित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या अमरावतीच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 21:53 IST

भुसावळ येथे मित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या नेहल श्रीराम गायधनी (वय २२ रा.अमरावती, ह.मु.विद्युत कॉलनी, जळगाव) हा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला परत येत असताना भरधाव टॅँकरने चिरडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजता महामार्गावर गोदावरी हॉस्पिटल व वैद्यकिय महाविद्यालयासमोर घडली.

ठळक मुद्देजळगाव शहरानजीक महामार्गावर झाला सायंकाळी अपघातवाढदिवस साजरा करुन परत येत होतामयत विद्यार्थी अमरावतीचा

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२२: भुसावळ येथे मित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या नेहल श्रीराम गायधनी (वय २२ रा.अमरावती, ह.मु.विद्युत कॉलनी, जळगाव) हा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला परत येत असताना भरधाव टॅँकरने चिरडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजता महामार्गावर गोदावरी हॉस्पिटल व वैद्यकिय महाविद्यालयासमोर घडली.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील शासकीय अभियांत्रिकी महविद्यालयात ई.अ‍ँड टी.सी.च्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असलेला नेहल हा मुळचा अमरावती येथील रहिवाशी आहे. विद्युत कॉलनीत मित्रांसोबत भाड्याने घर घेऊन तो तेथे राहत होता. बुधवारी अमरावती येथीलच त्याच्या मित्राचा वाढदिवस असल्याने नेहल हा दुपारी एका मित्राला घेऊन भुसावळ येथे दुचाकीने (क्र.एम.एच.२७ ए.के.३८५६) गेला होता. तेथून साडे पाच वाजता तो एकटाच परत यायला निघाला. गोदावरी हॉस्पिटल व वैद्यकिय महाविद्यालयाच्या समोर महामार्गावर दुचाकी घसरल्याने मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने (क्र.एम.एच.०४ सी.पी.३३६५) त्याला जोरदार धडक दिली. त्यात त्याच्या डोक्यावरुन टायर गेल्याने तो जागीच गत प्राण झाला.वाहन परवान्यावरुन पटली ओळखअपघात होताच टॅँकर चालक जागेवरुन पसार झाला. रस्त्यावरुन जाणारे राजेश रंगनाथ नाईक (रा.जळगाव) यांनी तत्काळ मदत कार्य केले. नशिराबाद पोलिसांना घटनेची माहिती दिली. एका रुग्णवाहिकेतून त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान, घटनास्थळावर त्याच्या खिशातील पाकीटामध्ये वाहन परवाना होता. त्यातील फोटो व नावावरुन नेहलची ओळख पटली.