शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाहानंतर परतलेल्या दाम्पत्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:18 IST

भुसावळ येथील युवतीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग आल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी मुलीसह तिचा पती, दीर व सासू यांना बेदम मारहाण केली. ही घटना १९ रोजी दुपारी एकला घडली.

ठळक मुद्देमाहेरच्या १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखलसर्व आरोपींना अटक

भुसावळ, जि.जळगाव : येथील जामनेर रोडवरील कृष्णा नगरातील रहिवासी युवतीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग आल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी मुलीसह तिचा पती, दीर व सासू यांना बेदम मारहाण केली. ही घटना १९ रोजी दुपारी एकला घडली. त्या विवाहितेच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिसात माहेरच्या १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.फिर्यादू मोना नितीन कांडेलकर (रा.कृष्णानगर, भुसावळ) या तरुणीने कृष्णा नगरमधील रहिवासी नितीन मधुकर कांडेलकर याच्याशी २१ आॅक्टोबर २०१८ रोजी भुसावळ न्यायालयात रजिस्टर विवाह केला आहे. तेव्हापासून ती पतीसोबत बाहेरगावी राहत होती. ती नितीन कांडेलकर यांच्यापासून आठ महिन्याची गर्भवती असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. मोना ही पतीसह १८ मे रोजी भुसावळ येथे आली. ही माहिती तिच्या नातेवाईकांना मिळाली. त्यामुळे आरोपी नवलसिंग मंजुसिंग भाडिया (रा.हरदा, मध्य प्रदेश), दीपसिंग तेजसिंग बावरा, बाबूसिंग दीपसिंग बावरा, प्रतापसिंग दरबारसिंग बाटिया, मंगलसिंग चंदासिंग छाबडा, अवतारसिंग दर्शनसिंग बाटिया, चंदनकौर मंगलहसिंग छाबडा, छायाकौर प्रधानसिंग बावरा, कुलजितसिंग मंगलसिंग बावरा, मोनुसिंग दीपसिंग बावरा, जतेसिंग गुमानसिंग बावरा, प्रधानसिंग चंदनसिंग बावरा व बलजितसिंग बावरा (सर्व रा.भुसावळ) यांनी १९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरी जाऊन शिवीगाळ व मारहाण केली. ती गर्भवती असतानाही तिच्या पोटात लाथ मारली. ही माहिती पती नितीन कांडेलक व दीर व सासू यांना मिळताच ते घरी आले. त्यावेळी आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. यासंदर्भात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास एपीआय सारिका खैरनार करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ