शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील बंदिस्त नाट्यगृहाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:05 IST

युद्धपातळीवर सुरू आहे काम

ठळक मुद्दे निधी वेळेवर मिळण्याची गरज९ कोटीची आवश्यकताकाम मुदतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा

जळगाव: महाबळ रस्त्यावरील बंदिस्त नाट्यगृहाचे काम ३१ डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याची धडपड बांधकाम विभागाकडून सुरू आहे. मात्र अद्यापही सभागृहाचे फिनिशींगचे, खुर्च्या बसविणे आदी काम मोठ्या प्रमाणावर बाकी आहे. या कामासाठी अद्यापही साडेसहा कोटीच्या निधीची गरज असून तो निधी वेळेवर उपलब्ध झाल्यास हे काम मुदतीत पूर्ण करणे शक्य होणार आहे.जवळपास २०१५ पासून नाट्यगृहातील इलेक्ट्रीकल सुविधांची कामे सुरू आहेत. मात्र ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. निधी वेळेवर मिळत नसल्याने अडचणी येत होत्या. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी याबाबत जुलै २०१७ मध्ये बैठक घेऊन आढावा घेतला होता. त्यावेळी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण करण्याची सूचना दिली होती. मात्र ते शक्य न झाल्याने ३१ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आॅक्टोबर महिना संपत आला असून दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यात नाट्यगृहाची अनेक कामे अद्याप बाकी आहेत. आतील बाजूने पीओपीचे काम सुरू आहे. सभागृहाचे छताचे पीओपीचे काम सुरू आहे. त्यास किती कालावधी लागतो? त्यावर इतर कामांचा कालावधी ठरणार आहे. कारण छताचे पीओपीचे काम सुरू असल्याने सभागृहात पूर्ण सेंट्रींग उभारण्यात आले आहे. त्यामुळे सभागृहात हे काम पूर्ण होऊन सेंट्रीग काढेपर्यंत अन्य काही काम करणे अशक्य आहे. सभागृहात खुर्च्या बसविण्याचे बाकी आहे. या खुर्च्या अद्याप प्राप्तही झालेल्या नाहीत. त्या बसविल्यानंतर सभागृहात कोबा (सिमेंटची घोटाई) करून त्यावर मॅट बसविण्यात येईल. स्टेजवर पडदा बसविणे, तसेच पीओपी झाल्यानंतर राहिलेले ईलेक्ट्रीक काम जसे होल्डर, बटन, दिवे बसविणे आदी कामे होतील. आतून रंगरंगोटीही बाकी आहे. ती देखील करावी लागेल. याखेरीज इतरही किरकोळ किरकोळ कामे बरीच आहेत. तसेच नाट्यगृहाच्या आवारात सपाटीकरण तसेच पेव्हर ब्लॉकचे कामही बाकी आहे.९ कोटीची आवश्यकतानाट्यगृहाच्या उर्वरीत कामासाठी ९ कोटीच्या निधीची गरज आहे. त्यापैकी २.४ कोटी नुकतेच मंजुर झाले आहेत. उर्वरीत ६.६ कोटीचा निधी कधी मिळतो, यावर कामाचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र हे काम मुदतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा बांधकाम विभागाच्या अधिकाºयांकडून केला जात आहे.