शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंच्या पक्षीय सीमोल्लंघनानंतर मुक्ताईनगरात जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 14:28 IST

मुक्ताईनगर : अखेर भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सीमोल्लंघन करून माजी मंत्री एकनाथ खडसे दसऱ्याच्या दिवशी रविवारी मुक्ताईनगरला पोहोचले. राष्ट्रवादी ...

मुक्ताईनगर : अखेर भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सीमोल्लंघन करून माजी मंत्री एकनाथ खडसे दसऱ्याच्या दिवशी रविवारी मुक्ताईनगरला पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि नाथाभाऊ समर्थकांनी शहरात खडसेंचे जोरदार स्वागत केले.शहरातील मुख्य प्रवर्तन चौकात तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, तालुका अध्यक्ष यु.डी.पाटील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष ईश्वर राहणे, शाहिदखान, कल्याण पाटील, पं.स.चे माजी सदस्य किशोर चौधरी, साहेबराव सिंगतकर, विजय सोनार, प्रवीण पाटील, आदींनी एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे स्वागत केले.याप्रसंगी खडसे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईहून अनेक कार्यकर्ते वाहनांनी खडसेंसोबतच शहरात दाखल झाले. कोथळी येथे मुक्ताई दर्शनानंतर खडसे मुक्ताईनगरात दाखल झाले.दुपारी एकच्या सुमारास खडसेंच्या गाड्यांच्या ताफ्याने प्रवेश शहरात प्रवेश करताच फटाक्यांच्या आतशबाजीने जोरदार स्वागत झाले. शहरात ठिकठिकाणी आतषबाजी करून खडसें स्वागत वेगवेळ्या पदाधिकारी व संघटनांनी केला ढोलताशे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या जयजयकाराच्या घोषणा पदाधिकारी कार्यकर्ते करीत होते. तत्पूर्वी एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, रवींद्र पाटील व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवर्तन चौकात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याना पुष्पार्पण केले.

टॅग्स :PoliticsराजकारणMuktainagarमुक्ताईनगर