शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापक संघटनांकडून महाविद्यालयांमध्ये जोरदार प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 17:42 IST

उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अधिसभेच्या विद्या परिषद, महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, व्यवस्थापन  परिषद व विविध अभ्यास मंडळाच्या सदस्यांसाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.खान्देशातील १८ केंद्रावर हे मतदान होणार असून, त्यासाठी  प्राध्यापक संघटनाकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. 

ठळक मुद्देउमवि अधिसभा निवडणूकखान्देशातील १८ केंद्रांवर होणार मतदान महाविद्यालयीन प्राध्यापक गटात जोरदार लढत

लोकमत आॅनलाईन,

जळगाव-दि.८,उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अधिसभेच्या विद्या परिषद, महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, व्यवस्थापन  परिषद व विविध अभ्यास मंडळाच्या सदस्यांसाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.खान्देशातील १८ केंद्रावर हे मतदान होणार असून, त्यासाठी  प्राध्यापक संघटनाकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. 

अधिसभेच्या विविध १८ जागांसाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. प्राचार्य गटाच्या १० जागांसह विद्यापीठ प्राध्यापक, व्यवस्थापन  परिषद व विद्यापरिषदेच्या अनेक जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे खºया अर्थाने महाविद्यालयीन प्राध्यापक गटात जोरदार लढत होणार आहे. तर व्यवस्थापन  परिषदेच्या ४ जागांसाठी देखील चांगलीच रस्सीखेच पहायला मिळणार आहे.

प्रचाराची पहिली फेरी पूर्णमतदानाला १० दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांकडून खान्देशातील महाविद्यालयांमध्ये जावून प्रत्यक्ष प्राध्यापकांच्या भेटी घेवून प्रचार केला जात आहे. महाविद्यालयीन  प्राध्यापक गटाच्या १० जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये खरी लढत एन.मुक्टो व एन.मुक्ता या दोन संघटनांमध्ये आहे. या  गटासाठी सर्वाधिक २ हजार ५२८ मतदार असल्याने त्यांच्या प्रत्यक्ष भेटीवर उमेदवारांकडून भर दिला जात आहे. दोन्ही प्राध्यापक संघटनांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली असून, आता दुसºया फेरीचा प्रचार सुरु होणार आहे. 

मतदान कें द्राबाबत लवकरच निश्चितीउत्तर महाराष्टÑ विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आहे. मतदानासाठी या तीनही जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्र असतील. कोणत्या शहरात मतदान  केंद्र राहणार आहेत. हे निश्चित करण्यात आले असून, शहरातील कोणत्या महाविद्यालयात मतदान घ्यावे याबाबत अद्याप निश्चिती झाली नाही. दोन दिवसात याबाबत आढावा घेवून मतदान केंद्र निश्चित करण्यात येणार आहे. एकूण १८ मतदान केंद्रांमध्ये जळगाव जिल्ह्यात ९, धुळे ५ व नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदान केंद्र राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.