शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

संपकऱ्यांचे वेतन कापणार, शिस्तभंगाची कारवाई होणार; जळगावात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आदेश

By अमित महाबळ | Updated: March 13, 2023 20:49 IST

संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करावी आणि आवश्यकता भासल्यास गृहरक्षक, पोलिस दलाची मदत घ्यावी, अशी सूचना आहे. 

जळगाव : संपामध्ये सहभागी होणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासह त्यांचे संपकाळातील वेतन कापण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी या संदर्भातील आदेश मनपा आयुक्त, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, प्रांत, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी यांना पाठवले आहेत. 

शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होणे ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल व अशा कर्मचाऱ्यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे आदेश त्वरित बजावण्यात यावेत, संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यास कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करावी आणि आवश्यकता भासल्यास गृहरक्षक, पोलिस दलाची मदत घ्यावी, अशी सूचना आहे. 

काम नाही, वेतन नाही

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्र शासनाचे काम नाही, वेतन नाही हे धोरण राज्य शासनही अनुसरत असल्याने कर्मचाऱ्यांना कळविण्यात यावे, असेही आदेशात म्हटले आहे. 

पोलिस तयारीत, बंदोबस्त पुरविणार

आम्ही विभागप्रमुखांना सांगितले आहे, की बंदोबस्त लागला तर कळवा. मात्र अद्याप अशी मागणी पोलिसांकडे आलेली नाही. तालुकास्तरावर आम्ही तयारीत आहोत. बंदोबस्त मागितला तर त्यानुसार व्यवस्था केली जाईल. - एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक, जळगाव

टॅग्स :JalgaonजळगावPensionनिवृत्ती वेतन