शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळच्या समतानगर आणि सिंधी कॉलनी परिसरात कडक संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:45 IST

दोन झोन मध्ये संचारबंदी

भुसावळ : शहरात कोरोना बाधित दोन रुग्ण आढळले आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनी येथे भेट देत रुग्ण आढळलेल्या दोन्ही भागात कडक संचारबंदी लागलू केली आहे. तसेच समतानगर व सिंधी कॉलनी हा परिसर १४ दिवस सील केला आहे. दरम्यान पूर्ण शहरच चार ते पाच दिवसांसाठी सील करण्यात यावे असे मत आमदार संजय सावकारे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याकडे मांडले आहे. यावर एकूण स्थिती पाहिल्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे व जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. उगले हे सोमवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरात पहाणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी जामनेर रोड वरील अष्टभुजा देवी मंदीराजवळ थांबून त्यांनी आमदार संजय सावकारे यांच्याशी चर्चा केली.शहर सील करायचे असेल तर १४ दिवसांचा कालावधी योग्य असतो. त्यामुळे ज्या परिसरात रुग्ण आढळले आहे. तो परिसर सील करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जो परिसरा सील करण्यात आला आहे. त्या परिसरात जीवनावश्यक वस्तू पोहचविण्याची जबाबदारी न.पा. कडे देण्यात आल्याचे सांगत त्यानी त्यांनी समता नगर व सिंधी कॉलनी परिसराची पहाणी केली.दोन झोन मध्ये संचारबंदीभुसावळात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याधिकारी ढाकणे यांच्या उपस्थितीत येथील शासकीय विश्राम गृहात तातडीची बैठक घेण्यात आली. शहरात कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी काय उपाय योजना करता येईल यावर चर्चा करण्यात आली. त्यादृष्टीने समतानगर व सिंधी कॉलनी या दोन झोनमध्ये अत्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे. बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने, डिवायएसपी गजानन राठोड, तहसीलदार दिपक धिवरे, मुख्याधिकारी करुना डहाळे, पो. नि. दिलीप भागवत, पो. नि. रामकृष्ण कुंभार, पो.नि. बाबासाहेब ठोंबे, मंडळ अधिकारी योगिता पाटील, तलाठी रतनाणी उपस्थित होते.नऊ जण हॉस्पिटल क्वारंटाइनभुसावळ शहरातील सिंधी कॉलनी परिसरात संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नऊ जणांना जळगाव येथे हॉस्पिटल क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच या रुग्णाच्या नातेवाईकांना तपासणीसाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे.