भुसावळ : तालुक्यातील गोजोरे, चोरवड, वराडसिम, शिंदी येथे रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली व उत्कर्ष कलाविष्कार यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना लसीकरण व घ्यावयाच्या काळजीबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली व लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.
तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मात्र, अद्यापही काही ठिकाणी याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यासाठी जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली व उत्कर्ष कलाविष्कार यांच्या संयुक्त विद्यमाने चोरवड गोजोरे वराडसिम व शिंदी येथे लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात आले.
यावेळी कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाचे फायदे तसेच गैरसमज याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी वराडसीम गावच्या प्रभारी सरपंच प्रतिभा जंगले, गोजोरे सरपंच योगेश चौधरी, चोरवड सरपंच प्रवीण गुंजाळ, शिंदी येथील सरपंच नीता जाधव, उपसरपंच कैलास पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज चौधरी, पोलीस पाटील अतुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड, कांचन परदेशी, कविता चौधरी, माया कोल्हे, सुमय्या छप्परबंद, दिलीप कोल्हे, सुवर्णा पाटील, किरण जाधव, संग्राम परदेशी, सुनील पाटील यांच्यासह रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे प्रेसिडेंट डॉ. संजू भटकर, सेक्रेटरी जीवन महाजन, ट्रेझरर सुनील वानखेडे, प्रोजेक्ट चेअरमन समाधान जाधव आदी उपस्थित होते.
पथनाट्य उत्कर्ष कलाविष्कार भुसावळचे रंगकर्मी स्वप्नील नन्नवरे, विक्रांत रोडे, गजानन चौधरी, ऋषिकेश तायडे, गोल्डी भटकर, शुभम तायडे, उमेश गोरधे यांनी सादर केले.
शिंदी येथे विलास पाटील म्हणाले की, हसतखेळत गावकऱ्यांना लसीकरण, कोरोना विषाणूबाबतची माहिती पथनाट्याद्वारे सांगितली.