शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचा अजबचं फंडा! चोरी केल्यानंतर जाळली दोन दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 13:15 IST

कृउबातील प्रकार

जळगाव : चोरी करण्याच्या नवीन पध्दती आजपर्यंत चोरट्यांनी वापरल्याचे पहावयास किंवा ऐकीवात असेल़ मात्र, चोरी केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी थेट दुकानच जाळण्याचा अजब फंडा चोरट्यांकडून आता वापरला जात आहे. शहरात अशा दोन घटना उघडकीस आल्या आहेत़ कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नंदलाल जीवनराम राठी व पुखराज अर्जुन प्रजापत यांच्या दुकानातून चोरट्यांनी सुमारे १ लाख ६५ हजार रूपयांची रोकड लंपास केली. घटना शनिवारी सकाळी ६़३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे़ विशेष म्हणजे, चोरट्यांनी चोरी केल्यानंतर दोन्ही दुकाने पेटवून दिल्यामुळे सुमारे १ लाख ४० हजार रूपयांचे नुकसानही झाले आहे़ याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नंदलाल राठी हे कुटूंबीयांसह शाहुनगरात वास्तव्यास आहेत़ त्यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० क्रमांकाचे दुकान आहे़ या दुकानातून धान्य व बारदानाची विक्री केली जाते़ या कामासाठी त्यांना शालक प्रकाश डोडीया हे मदत करतात़तसेच त्यांच्या दुकानाच्या रांगेतच पुखराज प्रजापत यांचेही बारदान विक्रीचे दुकान आहे़शुक्रवारी सायंकाळी सात वाजता कामकाज आटोपल्यानंतर दुकानाला कुलूप लावून नंदलाल व त्यांचे शालक हे घरी निघून गेले़ दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ६़३० वाजता नंदलाल यांना राजेश प्रजापत यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की, तुमच्या दुकानाचे शर्टर अर्धवट उघडे असून दुकानातून धूर निघत आहे़ लागलीच त्यांनी ही बाब शालकाला सांगितली व दोघे दुकानाच्या ठिकाणी आले़खुर्ची, एसी जळून खाकप्रजापत यांच्या दुकानातही चोरी केल्यानंतर चोरट्यांनी दुकान पेटवून दिले होते़ त्यात दुकानातील खुर्ची, ए़सी़तसेच फर्नीचर व इतर साहित्य जळून खाक झाले असून सुमारे चाळीस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे़ दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीही याच प्रकारे शाहुनगरातील एका दुकानात चोरी करून पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली होती़पोलिसात गुन्हा दाखलबाजार समितीतील दोन दुकानांमध्ये चोरी करून पेटवून दिल्याची घटना उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मुद्दस्सर काझी, असीम तडवी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली़तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासणीचे कामकाज सुरू आहे़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नंदलाल राठी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़राठी व डोडीया यांनी दुकानाची पाहणी केली असता, त्यांना चोरट्यांनी गल्लयातील पाच हजार रूपये चोरून नेल्याचे दिसून आले़ त्याचबरोबर दुकानाला आग लावल्याचे दिसले़ या आगीत जमा-खर्च वही, पास बुक, चेक बुक तसेच जंगम मालमत्तेची खरेदी-विक्री व्यवराहाराची संपूर्ण कागदपत्रे, जीएसटीची कागदपत्रे यासह इर्न्हरटर, ए़सी़ व इतर साहित्य असे सुमारे १ लाख रूपये किंमतीचे नुकसान झाल्याचे दिसून आले़दुसºया दुकानातून लांबविली १ लाख ३५ हजारांची रोकडचोरट्यांनी राठी यांच्या दुकानासोबतच जवळच असलेल्या पुखराज प्रजापत यांच्या दुकानामध्येही डल्ला मारून सुमारे १ लाख ३५ हजारांची रोकड लंपास केल्याचेही समोर आले़ त्याठिकाणी पाहणी केली असता चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेºयाची हार्डडिस्क तसेच डीव्हीआर, असे २५ हजाराचा ऐवजही चोरून नेल्याचे आढळून आले़याच पध्दतीने शाहूनगरात झाली होती चोरीगेल्या काही दिवंसापूर्वी शाहुनगरातील आईस्क्रीम पार्लरच्या दुकानातही चोरट्यांनी डल्ला मारून दुकान पेटवून दिले होते़ त्यानंतर आता बाजार समितीतील दोन दुकानांमध्ये चोरी करून पुन्हा पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे़ चोरी करण्याच्या वेगवेगळ्या शक्कल चोरटे लढवित असल्याचे या प्रकारांमधून समोर येत आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव