आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि.२७ : २०१४ ते २०१७ या तीन वषार्तील अर्थसंकल्पातील प्रारंभिक आकडेवारी चुकल्याने २०१८-१९ च्या अर्थसंकल्पातील प्रारंभिक शिलकीच्या २३ कोटी ७४ लाख ३० हजार ४६६ या रकमेवर आक्षेप घेत सुधारीत अर्थसंकल्प मांडण्यासह दुरुस्तीच्या सुचनाही स्विकारण्यात याव्या, अशी मागणी विरोधकांनी केली.मंगळवारी पालिकेच्या सभागृहात २०१८-१९ चा अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्यासह शविआचे गटनेते राजीव देशमुख, भाजपा गटनेते राजेंद्र चौधरी, शविआचे उपगटनेते सुरेश स्वार, संजय रतनसिंग पाटील, रामचंद्र जाधव, सूर्यकांत ठाकुर, चंद्रकांत तायडे यांनी चर्चेत सहभाग घेतला. अर्थसंकल्पातील आकडेवारी चुकीची असून असा सदोष अर्थसंकल्प स्विकारायचा का? असा प्रश्न राजीव देशमुख यांनी थेट नगराध्यक्षांना विचारला. यावर नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. चुका दुरुस्ती करण्याचेही मान्य केले. मात्र विरोधकांचे यावर समाधान झाले नाही. आकडेवारीत चुक करणा-या कर्मचा-यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी संजय रतनसिंग पाटील व चंद्रकांत तायडे या सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी केली. चुकांची दुरुस्ती करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी लागेल, असे मुख्याधिकारी मानोरकर यांनी सांगितले.
चाळीसगाव नगर पालिकेच्या अर्थसंकल्पावर वादळी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 16:03 IST
प्रारंभिक शिलकीच्या रकमेवर आक्षेप घेत दुरुस्तीच्या सुचना स्विकारण्याची केली विरोधकांनी मागणी
चाळीसगाव नगर पालिकेच्या अर्थसंकल्पावर वादळी चर्चा
ठळक मुद्देनगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी व्यक्त केली दिलगिरी.आकडेवारीत चुक करणा-या कर्मचा-यावर कारवाईची मागणीचुकांची दुरुस्ती करण्यासाठी लागणार दोन दिवसांचा अवधी