शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

साठवणूक दरावरून साठमारी

By admin | Updated: February 5, 2016 00:37 IST

धरणगाव : तालुक्यातील शेतक:यांसाठी शासनाने दीड महिन्यापूर्वी ज्वारी खरेदी केंद्राच्या उद्घाटनाचा ‘शो’ केला.

धरणगाव : तालुक्यातील शेतक:यांसाठी शासनाने दीड महिन्यापूर्वी ज्वारी खरेदी केंद्राच्या उद्घाटनाचा ‘शो’ केला. मात्र वखार महामंडळ व महसूल विभागाच्या पुरवठा खात्यामध्ये साठवणूक दराच्या वादामुळे ज्वारी खरेदी केंद्र सुरू झालेलेच नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतक:यांचे हाल होत असून त्यांना जिल्ह्यातील इतर केंद्रावर ज्वारी विक्रीसाठी जावे लागत आहे. ‘शो’ करून अधिकारी व पुढा:यांनी फोटो फंक्शन केलेच का? असा प्रश्न संतप्त शेतकरी विचारित आहे.

केंद्र सुरू करायचेच नव्हते तर उद्घाटनाचा

उद्घाटन झाले पण..

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 17 डिसेंबर 2015 रोजी आमदार गुलाबराव पाटील, कृउबा सभापती भीमराव पाटील, तहसीलदार, वखार महामंडळाचे अधिका:यांच्या उपस्थित शासनाच्या आदेशान्वये ज्वारी खरेदी केंद्राचे उद्घाटन व काटा पूजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आलेल्या शेतक:यांची 1 किलोही ज्वारी खरेदी केली गेली नाही. याचे कारण असे सांगण्यात येते की, खरेदी केली तर साठवणूक करणार कुठे? आमच्याकडे साठवणुकीसाठी जागाच नाही. शासनाच्या अधिका:यांनी याचा विचार वा नियोजन केंद्र सुरू करण्यापूर्वीच का केला नाही. हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुरवठा विभागाकडे थकबाकी

वखार महामंडळाचे दर व पुरवठा विभागाचे दर यांच्यात प्रती कट्टा (50 कि.) भाडे दरात 3 रु. 60 पैशांची तफावत आहे. त्यामुळे पुरवठा विभागाकडे सन 2001 पासून वखार महामंडळाचे 31 लक्ष 48 हजार 252 रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी भरावी व पणन हंगाम साठवणूक बिल महामंडळाच्या प्रचलित दराप्रमाणे भरून खरेदी केंद्र सुरू करावे, अशी विनंती धरणगावचे वखार महामंडळाचे साठा अधीक्षक व्ही.एस. पिंपळे यांनी 2 जानेवारी व 19 जानेवारी 2016 च्या पत्रकान्वये तहसीलदार यांना विनंती केली आहे.

जिल्हाधिका:यांची मागणी

या संदर्भात जिल्हाधिका:यांकडे पाठपुरावा केला असता रुबल अग्रवाल यांनी 10-11-2015 रोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव दीपक कपूर यांना पत्र पाठवून वखार महामंडळाच्या प्रचलित दराप्रमाणे साठवणूक भाडेवाढ करावी, अशी मागणी केली आहे. मात्र अद्याप शासनाने या संदर्भात कुठलाच निर्णय न घेतल्याने धरणगावचे ज्वारी खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाही. या निद्रिस्थ सरकार व शासनाला शेतक:यांच्या प्रश्नाविषयी कुठलीच पर्वा नसल्याचे मत व्यक्त होत आहे.

लोकप्रतिनिधी गेले कुठे..?

ज्वारी खरेदी केंद्राचे उद्घाटन होऊन दोन महिने होत आहे. शेतकरी नाईलाजाने खासगी व्यापा:यांना ज्वारी विकत आहे. या केंद्रावर - त्या केंद्रावर हेलपाटे घालत आहे. मात्र आमदार, खासदार त्याचप्रमाणे विरोधी पक्षाचे पुढारी यांनी एक शब्दही कुठे आवाज उठविला नसल्याने शेतक:यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

(वार्ताहर)