शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी जळगावात मालवाहतूकदारांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:55 IST

जोरदार घोषणाबाजी

ठळक मुद्दे जिल्हाभरातील मालवाहतूकदार व हमाल बांधव सहभागीव्यवसाय अधिकच अडचणीत

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून विविध मागण्यासांठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँंगेस नवी दिल्लीतर्फे: देशव्यापी बेमुदत संप सुरु असून या संपात जळगाव जिल्ह्यातील ५०० वाहतूकदारांनी सहभाग घेतला आहे. मात्र, सरकारतर्फे आठवडाभरापासून कुठल्याही मागण्या मान्य न झाल्यामुळे शहरातील माल वाहतूकदारांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता अजिंठा चौकात रास्ता रोका आंदोलन करुन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने, ट्रान्सपोर्ट धारकांना व्यवसाय करणे अवघड झाले आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून ई-वे बिलची प्रक्रिया अमलात आणली असून, ट्रन्सपोर्ट धारकांंना मालाची डिलीव्हरी करतांना ई-वे बिलांमधील बी नावाचा फार्म भरणे भरुन, संबंधीत मालाची पावती जवळ बाळगणे गरजेचे आहे. मात्र, या बिलात नजरचुकीने चूक झाल्यास गाडीमध्ये जितक्या किंमतीचा माल असेल, तितक्या किंमतीचा दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच टोलमाफी न झाल्यामुळे हा व्यवसाय अधिकच अडचणीत आल्याने, मालवाहतूक दारांनी मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, गेल्या आठवड्यांत परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा न झालेल्या जळगाव जिल्हा मालवाहतूक दार संघटनेचे अध्यक्ष पप्पू बग्गा यांच्या नेतृत्वाखाली अजिंठा चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात जिल्हाभरातील मालवाहतूकदार व हमाल बांधव सहभागी झाले होते. या वेळी सरकारतर्फे कुठल्याही मागण्या मान्य होत नसल्यामुळे सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी उपाध्यक्ष अशोक वाघ, सचिव राधेश्याम व्यास यांच्यासह बशीर राणानी, अरुण दलाल, नईम मेमन यांच्यासह हमाल बांधव उपस्थित होते.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव