शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिरसमणी येथे विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 01:20 IST

शिक्षणासाठी जाताना दररोज बसमधून प्रवास करावा लागत असतो. परंतु पुरेशा आणि वेळेवर बसेस नसल्याने विद्यार्थी- विद्यार्थिनींचे हाल होत असतात यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथे रास्ता रोको करून बसेस अडविल्या.

ठळक मुद्देगावकºयांनी व एस.टी. कर्मचाºयांनी काढली विद्यार्थ्यांची समजूतबसमधून दोन विद्यार्थी पडल्याने संतापात पडली होती भर

पारोळा : दररोज पारोळा येथे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिंनींना एस.टी. बसच्या प्रवासात विविध अडचणींमुळे सोसाव्या लागणाºया त्रासामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे येथे काही वेळ बस वाहतूक ठप्प पडली होती.तालुक्यातील शिरसमणी येथे मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पारोळा येथे कॉलेजला जाणाºया विद्यार्थ्यांनी एस.टी. बसेस अडवून रास्ता रोको केला. विद्यार्थ्यांना सतत अपडाऊन करताना होणाºया त्रासाला कंटाळून त्यांनी बसेस थांबवून परिवहन मंडळाचा निषेध केला. कॉलेज व शाळेची वेळ ११ वाजेची असून वेळेवर कधीच बस येत नाही. कधी कधी तर या फेºया सुद्धा बंद असतात. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. व अनेकवेळा लेखी तोंडीं तक्रारी देऊन सुध्दा दखल घेतली जात नाही, म्हणून विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचलले. दरम्यान, सोमवारी याच बसमधून शिरसमणी येथील दोन विद्यार्थी बसचा दरवाजा अचानक उघडल्याने खाली पडून गंभीर जखमी झाले असून ते दवाखान्यात अ‍ॅडमिट आहेत. या घटनेला चालक व वाहक जबाबदार असल्याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, शिरसमणी येथून येणाºया विद्यार्थ्यांना जादा बस सोडण्याबाबत अमळनेरचे नियंत्रक अर्चना भदाणे यांनी लेखी आश्वासन दिले होते. परंतु आज पुन्हा बस वेळेवर आली नाही व जादा बसही सोडली नाही, म्हणून उशिरा आलेली बस जाऊ देणारं नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला त्यामुळे बराच वेळ दोन बसेस शिरसमणी येथे थांबून होत्या. गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष महाजन, चेतन पाटील, रोहीदास पाटील, हेमराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना समजुत घातली व पोलिसासमोर उद्यापासून बसेसची फेरी वाढवून नियमित व वेळेवर बस पाठवू असे आश्वासन एस.टी. कर्मचारी यांनी दिले. 

टॅग्स :agitationआंदोलन