शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पर्यायी रस्त्यासाठी २७ रोजी रेल्वे रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:11 IST

शिवाजीनगर बचाव समितीच्या सभेत रहिवासी एकटवले

ठळक मुद्देआता संघर्षाची वेळ :

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामाला आमचा विरोध नाही, प्रशासनाने पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देणे, ही आमची मागणी आहे. या यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत पत्रव्यवहार केला. तरीदेखील पर्यायी रस्ता मिळाला नाही. प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत असून, वेळेवर उपचार न मिळाल्याने आठवडाभरात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून, पर्यायी रस्त्यासाठी येत्या २७ मार्च रोजी रेल्वे रोको करण्याचा निर्धार शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीच्या शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत करण्यात आला. या वेळी बैठकीला उपस्थित नागरिकांनी प्रशासन व लोक प्रतिनिधी यांच्यावरही तीव्र संताप व्यक्त केला.जीर्ण झालेल्या शिवाजीनगर पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे शिवाजीनगर भागातील रहिवाशांना सुरत रेल्वे गेटमार्गे मोठ्या फेऱ्यातून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीतर्फे २२ मार्च रोजी सायंकाळी शिवाजीनगरातील क्रांती चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष दीपककुमार गुप्ता, राजेंद्र गाडगीळ, कार्याध्यक्ष इमरान शेख, उपाध्यक्ष मजहर पठाण, विजय बादल, सचिव जहागीर. ए. खान, सहसचिव शेख इकबाल शेख वजीर, कोषाध्यक्ष रमेश जोगी यांच्यासह नरेंद्र पिठवे, मसूद खान चाँद खान उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला राजेंद्र गाडगीळ यांनी पर्यायी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून,रेल्वे रुळ ओलांडून जावे लागत आहे. रेल्वेच्या कामाला आमचा विरोध नाही. रेल्वे प्रशासनाने रहिवाशांचा त्रास लक्षात घेता, तात्काळ पर्यायी रस्ता उपलब्ध करण्याची मागणी केली. यानंतर विलास सांगोरे यांनी पर्यायी रस्ता उपलब्ध केल्यानंतरच पुलाचे काम सुरु करायला हवे होते. पर्यायी रस्ता नसल्यामुळे, नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.प्रशासनाला वारंवार विनंती करुनही, लक्ष दिले जात नाही. त्यामुळे आपल्या मागण्यासांठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.यानंतर दीपककुमार गुप्ता यांनी सांगितले की, पुलाच्या कामाला एक महिना होत असून, रेल्वे प्रशासनाने फक्त ५ इंचाचा पूल खोदला आहे. अतिशय संथ गतीने काम सुरु आहे. प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेतलेले नाही, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असून, या आता पर्यायी रस्ता झाल्याशिवाय मागे न हटण्याचे आवाहन नागरिकांना केले. तसेच ‘टी’ आकाराच्या पूलालाही विरोध असून, याविरोधात आवाज उठविण्याचे सांगितले.रेल्वे प्रशासनासह ज्यांना आपण निवडून देतो, त्या लोकप्रतिनिधींचेही आपल्याकडे लक्ष नाही. त्यांनीदेखील शिवाजीनगरातील नागरिकांचा विश्वासघात केला असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले.पर्यायी रस्त्यासाठी दोन विद्यार्थिनींनी दाखल केली याचिकापर्यायी रस्ता व्हावा, यासाठी आपल्या दोन मुलींनीदेखील न्यायालयात पुर्नयाचिका दाखल केली असल्याची माहिती दीपककुमार गुप्ता यांनी सांगितले. माझी एक मुलगी इयत्ता १२ व लहान मुलगी १० इयत्ता शिकते. त्यांनादेखील रेल्वे रुळ ओलांडून शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला शाळेत जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्या संदर्भात याचिका दाखल केली असून, यावर पुढील आठवड्यांत कामकाज असल्याचे सांगितले.