शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरओडीएच्या पाईपलाईनची गळती थांबता थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 18:58 IST

मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरील ओडीएची पाईपलाईन गेल्या महिन्यांपासून ५० फूट अंतरावर दोन ठिकाणी फुटली आहे. जीर्ण झालेल्या या पाईपलाईनमुळे दररोज लाखो लीटर पाणी पुन्हा नदीतच वाहून जात आहे. मात्र ते उपयोगात येत नाही. कायमस्वरूपी नासाडी होणाऱ्या पाण्याचा अपव्यय थांबवावा. वेळोवेळी फुटणारी पाईपलाईन पूर्णपणे बदलावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

ठळक मुद्देनदीचे पाणी पुन्हा नदीतचदररोजच होते पाण्याची नासाडीसतत फुटणाºया पाईपलाईनमुळे कर्मचारीही वैतागले

हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरील ओडीएची पाईपलाईन गेल्या महिन्यांपासून ५० फूट अंतरावर दोन ठिकाणी फुटली आहे. जीर्ण झालेल्या या पाईपलाईनमुळे दररोज लाखो लीटर पाणी पुन्हा नदीतच वाहून जात आहे. मात्र ते उपयोगात येत नाही. कायमस्वरूपी नासाडी होणाऱ्या पाण्याचा अपव्यय थांबवावा. वेळोवेळी फुटणारी पाईपलाईन पूर्णपणे बदलावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.एकीकडे पाण्याची भीषण टंचाई व दुसरीकडे पाण्याची नासाडी, पाणी वाहत असल्याचे पाहून नागरिकांना धक्का बसत आहे. ओडीएच्या टाकीत पाणी न जाता मध्येच गळती होते. त्यावरील वेळ, वीज विनाकारण वाया जाते. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.नेहमीचाच प्रकारपूर्णा नदी ते हरताळे गावालगत असलेल्या या पाईपलाईनचे महिना गणिक पाईपलाईन पुरवठा विभागाकडून दाखल घेतली जाते व तत्काळ दुरुस्ती केली जाते. इकडे गळती जोडली गेली की काही दिवसातच दुसरीकडे गळती लागते. हे आता नित्याचेच झाले आहे. यामुळे या विभागाचे कर्मचारीदेखील त्रस्त झाले आहे. कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नसल्याची खंत व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे ह्या पाईपलाईन गळतीचे ठिकाण नदी व पंपिंग हाऊसपासून रहदारीवरच आहे. त्वरित दखल घेऊन वाया जाणारे पाणी, वेळ, वीज थांबवावी, अशी आशा व्यक्त होत आहे. 

टॅग्स :WaterपाणीMuktainagarमुक्ताईनगर