लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते. मात्र, मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढला आहे. त्यामुळे समाजबांधवांनी घरीच राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी व त्यांना अभिवादन करावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केली आहे.
१४ एप्रिल रोजी रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ गर्दी न करता, आपापल्या परिसरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
पुष्पहार अर्पण करण्यासाठी पाच व्यक्तींची परवानगी द्यावी
१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी स्थानिक पातळीवर पाच लोकांना फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करून परवानगी द्यावी, अशीही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे अनिल अडकमोल यांनी केली आहे.