शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव महापालिकेत उभाणार सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:11 IST

प्रेरणादायी कार्याची महती भावी पिढीला माहिती होण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांचा मनोदय

जळगाव : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जळगाव महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये उभारण्यात येणार असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळताच पुतळा उभा राहणार असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.भारत मातेच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रेरणादायी कार्य देशाचे मोठे वैभव असून हे कार्य भावी पिढीलाही माहिती व्हावे व त्यांची प्रेरणा सदैव सर्वांना मिळत राहावी यासाठी त्यांचा पुतळा मनपात उभारण्याचा मनोदय असल्याचे आमदार भोेळे यांचे म्हणणे आहे. ३१ आॅक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असून या दिवसाचे औचित्य साधत आमदार भोळे यांच्या या मनोदयाविषयी माहिती जाणून घेतली असता, त्यांनी पुतळा अनावरणाविषयी माहिती दिली.पुतळा उभारण्याविषयी प्रस्ताव तयार करण्यात येऊन तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. या प्रस्तावास मंजुरी मिळताच मनपा इमारतीमधील लिफ्टच्या बाजूला असलेल्या जागेत हा पुतळा उभा राहणार आहे.पुणे येथे साकारला पुतळामनपात बसविण्यात येणारा पुतळा तयारदेखील झाला असून तो पुणे येथे आकाराला आला आहे. सात फूट उंचीचा हा पुतळा असून तो पुण्याहून जळगावात आणण्यात येणार आहे. यासाठी आता प्रतीक्षा आहे ती केवळ प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळण्याची. साधारण महिना-दीड महिन्यात मंजुरी मिळून हे काम मार्गी लागू शकेल, असा विश्वास आमदार भोळे यांनी व्यक्त केला.सर्वांना सोबत घेऊन पुतळ््याचे कामसरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा अनावरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाली नाही तरी पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी एकनाथराव खडसे यांच्यासह सर्वांना सोबत घेऊन व या मान्यवरांच्या उपस्थितीत पुतळ््याचे अनावरण करण्यात येईल, असेही आमदार भोळे म्हणाले.मनपाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात येणार असून तसा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळताच पुतळा उभा राहणार आहे.- आमदार सुरेश भोळे.

टॅग्स :Jalgaonजळगाव