शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

नाहाटा महाविद्यालयात ‘संशोधनाचा आराखडा कसा तयार करावा’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 16:49 IST

खान्देशातील महाविद्यालयांचा सहभाग

भुसावळ : ‘संशोधनाचा आराखडा कसा तयार करावा’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा येथील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात झाली.ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक होते. कार्यशाळेचे उद्घाटन उमविच्या व्यवस्थापन विभागाच्या संचालक प्रा.डॉ.सीमा जोशी यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विष्णू चौधरी, प्राचार्या डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, डॉ.एस.व्ही. पाटील, प्रा.एन.ई.भंगाळे, डॉ.बी.एच. बºहाटे, प्रा.व्ही.जी.कोचुरे उपस्थित होते. डॉ. सीमा जोशी यांनी दीपप्रज्वलन केले.कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ.रामेश्वर चव्हाण यांनी संशोधन आराखड्याची आवश्यकता व महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले, तर डॉ.सीमा जोशी यांनी संशोधन आराखड्याची रूपरेषा कशी तयार करावी याविषयी विचार मांडले. शिरपूरचे डॉ.दिनेश भकड यांनी संशोधन आराखडा तयार करताना असलेल्या साहित्याचा आढावा घेऊन त्याची मांडणी कशी करावी याबाबत सांगितले.कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ.रश्मी शर्मा यांनी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन पद्धतीविषयी मार्गदर्शन केले. डॉ.एस.पी.झनके यांनी कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन विषय कसा निवडावा, संशोधनाचे प्रकार, सामाजिकशास्त्र संशाधन पद्धती, भाषा व साहित्य यासारख्या विषयांमध्ये संशोधन करू करणाºयांंसाठी प्राथमिक व दुय्यम माहितीचे स्त्रोत कसे निवडावे, संशोधन आराखडा, संशोधनाचे नियोजन याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.एस.डी.येवले यांनी विज्ञानाच्या संशोधक विद्यार्थ्यांना रिसर्च मेथडोलॉजी याबाबत मार्गदर्शन केले.दुपारच्या सत्रात बोदवड येथील प्रा.अरविंद चौधरी यांनी संशोधन कार्यात संशोधन पद्धतीचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमास विविध जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांतून प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.बेंडाळे यांनी, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी यांनी केले. वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे, विभागप्रमुख प्रा.व्ही.जी.कोचुरे, प्रा.पी. के. पाटील, प्रा.के.पी.पाटील, प्रा.एम.सी. पाटील, प्रा.डॉ.विलास महिरे, डॉ.किरण वारके, प्रा.डॉ.एम.जे. जाधव, प्रा.स्वाती शेळके, प्रा.प्रियांका वारके, प्रा.भूषण चौधरी, प्रा.जयश्री चौधरी, प्रा.वर्षा पाटील, प्रा.तेजश्री चोरडिया, प्रा.हेमंत सावकारे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Educationशिक्षणBhusawalभुसावळ