शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती : सत्तांतरानंतर जामनेरचे टेक्सटाईल पार्कचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 23:37 IST

सत्ता बदलाचा मोठा फटका टेक्सटाईल पार्कच्या उभारणीस बसला असून, काम थंडावले आहे.

ठळक मुद्देनगरपालिकेच्या कामांनाही निधीचा ब्रेकवाघूर उपसा योजनेला निधी नाही

मोहन सारस्वत/सैयद लियाकतजामनेर : राज्यात सत्ताबदल होऊन एक वर्ष झाल्यानंतर राज्य शासनाकडून नवीन कामांना मंजुरी मिळाली नाही व सुरु असलेल्या कामांसाठी मंजूर झालेल्या निधीतील राहिलेली रक्कम मिळत नसल्याने विकास कामे ठप्प पडली आहे. सत्ता बदलाचा मोठा फटका टेक्सटाईल पार्कच्या उभारणीस बसला असून, काम थंडावले आहे.तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील पहिले टेक्सटाईल पार्क जामनेरला होईल, अशी घोषणा केली होती. घोषणेनंतर पार्क उभारणीच्या कामाला गती मिळाली होती. असली  महाजन यांनी केलेल्या औद्योगिक वसाहतीच्या जागेच्या भूमिपूजनानंतर जमीन सपाटीकरणास इतर कामे वेगात झाली.टेक्सटाईल पार्कसाठी अंबिलहोळ, गारखेडे व होळहवेली परिसरातील खासगी व शासकीय वनजमीन अधिग्रहणाची प्रक्रीया झाली. खाजगी जमीनधारकांकडून करारपत्र करण्यात आले असूून अद्याप मोबदला वाटप झालेला नाही. मोबदला देण्यासाठी एमआयडीसीकडे रकमेची मागणी केली असुन यानंतरच पुढील कामे सुरू होऊ शकतात. वाघूर उपसा सिंचन योजनेला निधी नाही वाघूर धरणातून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरविणाऱ्या उपसा सिंचन योजनेचे काम माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पूर्णत्वाकडे नेले. अंतिम टप्प्यातील कामासाठी लागणारा निधी मिळत नसल्याने योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. नगरपालिकेच्या कामांनाही ब्रेक जामनेर नगरपालिकेसाठी महाजन यांनी युती शासन काळात विकास कामांसाठी निधीची तरतूद केल्याने पाण पुरवठा, भूमिगत गटार व सोनबरडी टेकडी विकास योजनेच्या कामांना सुरुवात झाली.  मंजूर झालेल्या ३५ कोटी निधीपैकी साडेनऊ कोटीचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर कामांना सुरुवात झाली. दुसऱ्या टप्यातील निधीची मागणी केली आहे.  निधीअभावी रस्ता दुरुस्तीचे  काम रखडल्याचे पालिका पपदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सोनबरडी विकासासाठी मंजूर १४.५ कोटीपैकी फक्त दीड कोटीचा निधी मिळाला आहे. निधीअभावी कामे ठप्प पडली आहे.

जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने टेक्सटाईल पार्क होणे गरजेचे आहे. शासनाच्या आडमुठे धोरणामुळे निधी मिळत नाही. ५० टक्के तरी निधी द्यावा जेणेकरुन काम सुरू होऊ शकेल. जळगांव येथील मेडिकल कॉलेजच्या उर्वरीत कामासाठी ७५० कोटीचा निधी आमच्या शासन काळात मंजूर करुन या कामांचे टेंडरदेखील निघाले, मात्र सध्याच्या शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे काम रखडले आहे. महाविकास आघाडी शासनाच्या एक वर्षाच्या काळात कोणतेही नवीन काम सुरू झाले नाही व सुरू असलेल्या कामांना निधी न देता ती रोखून धरली गेली.      - गिरीश महाजन, माजीमंत्री, आमदार

टॅग्स :cottonकापूसJamnerजामनेर