शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सर्वबाजुने अडचणीत - सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 18:50 IST

पत्रपरिषद

ठळक मुद्देराजा तुपाशी अन् जनता उपाशीशेतक:यांसाठी नाही पण जाहिरातबाजीसाठी आहे सरकारकडे पैसा
जळगाव- शेतक:यांना कर्जमाफी नाही, बोंडअळीची भरपाई नाही, उद्योग क्षेत्रातही आम्ही मागे पडलो, कुपोषणामुळे बालमृत्यूचे वाढले आहते. एकेकाळी नंबर वन असलेले महाराष्ट्र राज्य आज सर्वच बाबतीत अडचणीत आले आहे तसेच पिछाडीवर पडले आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे पत्रपरिषदेत केली. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने त्या जिल्ह्यात आल्या असून बुधवारी सकाळी राष्ट्रवादी कार्यालयात ही पत्रपरिषद झाली. राजा तुपाशी अन् जनता उपाशीसरकारमुळे त्रस्त झालेली जनता मंत्रालयात आत्महत्या करीत असल्याने त्या रोखण्यासाठी मंत्रालयातही जाळ्या बसवाव्या लागल्या. जेथे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बसले त्या इमारतीला आज जाळी बसवावी लागले आहे, याचे वाईट वाटते आहे. महागाई आणि बोरोजगारी वाढली असून ‘राजा तुपाशी अन् जनता उपाशी अशी आजची स्थिती असल्याची टिकाही सुळे यांनी केली. शिक्षणाचा अधिकार हिरावला जात आहेडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे सर्वाना शिक्षणाचा अधिकार दिलेला असतांना, राज्य सरकार अनेक शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे. अशाप्रकारे गरीबांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेण्याचा शासनाला काय अधिकार आहे? असा सवालही सुळे यांनी उपस्थित केला. लोकांच्या अपेक्षांचे ओङो घ्यावे लागणार हल्लाबोल यात्रेदरम्यान लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत. लोकांच्या अपेक्षांचे ओङो आम्हाला घ्यावे लागणार आहे. यामुळे या प्रतिसादाचे ‘टेन्शन’ही आहे. मतांच्या अपेक्षेने ही यात्रा नसून सध्याचे राज्यकर्ते नाकर्ते आहेत म्हणून आम्हाला निवडून यायचे नाही, तर आम्ही चांगले आहोत म्हणून आम्हला निवडून यायचे आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शेतक:यांसाठी नाही पण जाहिरातबाजीसाठी आहे सरकारकडे पैसाशेतक:यांच्य कजर्माफीसाठी तसेच त्याच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिरातबाजीवर कोटय़वधी रुपये खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, अशी टिकाही सुप्रिया सुळे यांनी केली. ‘बेटी बचाव’ अभियानाच्या जाहिरातींसाठीही प्रचंड पैसा खर्च केला मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट महाराष्ट्रात स्त्रीजन्म दर हा आता घटला आहे. लहान मुलीने दिलेली केळी ही सर्वात मोठी भेटसुप्रिया सुळे यांनी यावेळी एक अनुभवही सांगितला. रावेर येथील सभा आटोपून रस्त्याने जात असताना एक लहान मुलगी रस्त्याच्या कडेला तिच्या वडिलांसोबत उभी होती. तिने आमच्या गाडय़ांना हात दिला. मी गाडी थांबवली असताना तिने केळीची फणी भेट देवून सांगितले ताई आमच्या केळीला योग्य भाव मिळत नसून योग्य भाव मिळवून द्या. मुलीला असलेली चिंता पाहून मन गहिवरल्याचे सुळे यांनी सांगतले तर तिने दिलेली केळीची भेट सर्वात मोठी वाटली, असेही त्यांनी सांगितले.