शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘नही’कडून महामार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 20:03 IST

‘लोकमत’चा पाठपुरावा : आता समांतर रस्त्यासाठी लढा

जळगाव : केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार शहरातील महामार्गावरील खड्डे व साईडपट्टी दुरुस्तीचे काम सोमवारी हाती घेण्यात आले. सकाळी ११ वाजता आहुजा नगर व द्वारका नगराजवळ यंत्रसामुग्री व मनुष्यबळ दाखल झाले. दिवसभरात या भागातील काम पूर्ण करण्यात आले. दरम्यान, या रस्त्याबाबत ‘लोकमत’ ने सोमवारी वृत्त प्रकाशित केले होते.राष्ट्रीय महामार्गावर आहुजा नगराजवळ शनिवारी सायंकाळी दुचाकीवरील गायत्री समाधान पाटील (२७, रा़ वाणी गल्ली, पिंप्राळा) ही महिला ठार झाली होती. खराब रस्ते, साईडपट्टीमुळे अपघात होत असल्याने या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना व्ट्ीट करुन जळगाव शहरातील व जिल्ह्यातील हायवेवर अपघातात किड्या मुंग्यासारखे रोज निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. ‘नही’ चे अधिकारी दाद देत नाहीत. कृपया आपण तात्काळ रस्ते दुरुस्तीसाठी कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली होती. रस्ता दुरुस्ती झाली नाही तर आंदोलन करण्याचाही इशारा देसले यांनी दिला होता.गडकरी यांनी या व्ट्ीटची दखल घेऊन तत्काळ ‘नही’चे प्रकल्प संचालक सी.एम.सिन्हा यांच्याशी संपर्क साधून तातडीने रस्ते दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर सिन्हा यांनी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे कंत्राटदार तथा अ‍ॅग्रो इन्फोचे संचालक आर.के.मित्तल यांना तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या.देसले यांच्या समक्ष कामाला सुरुवातआश्वासनाप्रमाणे मित्तल यांनी शनिवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली, तेथे योगेश देसले यांनाही बोलावण्यात आले होते. खड्डे दुरुस्ती, साईडपट्ट्यांचा भराव व डांबरीकरण असे काम करण्यात आले. दोन दिवसात या भागातील काम पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान, खोटे नगर ते गिरणा पूल या दरम्यान महामार्गाला लागून समांतर रस्ते व्हायला हवे, त्यासाठी आपला पाठपुरावा सुरु असून हा प्रश्न मार्गी लागला नाही तर रहिवाशांना घेऊन आंदोलन करु असा इशारा देसले यांनी दिला आहे.

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाJalgaonजळगाव