शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ शहरात एलईडी दिवे बसविण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:50 IST

वीज बिलात होणार ५० टक्के बचत : कंपनी करणार सात वर्षे दुरुस्ती

भुसावळ, जि.जळगाव : गेल्या काही वर्षांपासून शहरातील पथदिव्यांची झालेली दुरवस्था व वीज बचतीच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या अखत्यारीत्यातील कंपनीला शहरातील पथदिव्यांच्या कामांबाबत नुकताच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पुढाकाराने करार करण्यात आला होता. हे पथदिवे बसविण्याच्या कामाचा शुभारंभ एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी रोजी करण्यात आला.शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात जुन्या ट्यूब काढून ३५ ठिकाणी केंद्र सरकारच्या अखत्यारितील कंपनीकडून पथदिव्यांच्या कामाचा शुभारंभ सकाळी १० वाजता करण्यात आला.या वेळी नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, शिक्षण समिती सभापती अ‍ॅड.बोधराज चौधरी, नगरसेवक किरण कोलते, चंद्रशेखर अत्तरदे, माजी नगरसेवक वसंत पाटील, माजी नगरसेवक परिक्षित बºहाटे, गिरीश महाजन, भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, सतीश सपकाळे, बुथ विस्तारक दिनेश नेमाडे, प्रा. प्रशांत पाटील, सरचिटणीस रमाशंकर दुबे यांच्यासह कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.गजानन मंदिर भागात पथदिवे बसविण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने मंदिर पदाधिकारी व परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष रमण भोळे यांचा सत्कार केला.बिघाड २४ तासात निकालीशहरात नव्याने बसविण्यात येणाऱ्या या पथदिव्यांमुळे पालिकेच्या वीज बिलात ५० टक्के बचत होणार आहे. शिवाय कंपनी सात वर्षे पालिकेला ही सुविधा पुरविणार आहे. तसेच शहरातील पथदिव्याचा बिघाड २४ तासात निकाली काढण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे .

टॅग्स :Nagar BhavanनगरभवनBhusawalभुसावळ