वाहनांच्या रांगा
जळगाव : निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर दुकाने उघडण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर जि.प.च्या जुन्या इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चारचाकी वाहनांची मोठी रांग लागलेली हाेती. हा एकमेव रस्ता जिल्हा परिषदेत जायचा असल्याने मिळेल त्या जागेवर वाहने लावल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
बेंडाळे चौकात वाहने खाेळंबली
जळगाव : निर्बंध शिथिल झाल्यानंतर मंगळवारी विविध रस्त्यांवर वाहनांची वर्दळ सुरू झाली होती. यात बेंडाळे चौकात एकाच वेळी चारही बाजूंनी वाहने येत असल्याने बराच वेळ वाहतूक खोळंबली होती. याठिकाणी वाहतूक पोलीसही नव्हते. याठिकाणी हॉर्नमुळे गोंगाटाचे वातावरणही निर्माण झाले होते.
आरोग्य केंद्रांत अधिक लसीकरण
जळगाव : जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक १,४३,३०३ लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. ग्रामीण भागात लसीकरणाला हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणासाठी केंद्रे वाढविण्यात आली आहेत. मात्र, लसींचा पुरवठा त्यादृष्टीने होत नसल्याने लसीकरणाला वेग येत नसल्याचे चित्र आहे.