शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

कर्मचारी संघटनांचा संप : जळगाव जिल्ह्यात शाळांना सुट्टी, महसूल, पंचायत समितीचे कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 12:55 IST

मोबाईल दुकाने देखील बंद

जळगाव : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ संघटीत, असंघटीत, कंत्राटी, रोजंदारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध संघटना सहभागी झाल्या असून संपामुळे बँकींग व्यवहार ठप्प झाले आहे.मोबाईल दुकाने देखील बंदअमळनेर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना, महसूल कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटना, विस्तार अधिकारी संघटना तसेच मोबाईल विक्रेते दुकानदार आपापल्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी बंदमध्ये सहभागी होऊन संपावर उतरले आहेत.महसूल कर्मचारी संघटनेने तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन देऊन संपावर उतरले आहेत. यावेळी नायब तहसीलदार कमलाकर जोशी, राजेंद्र चौधरी, उपविभागीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश सोनवणे, तहसील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भूषण पाटील, संदीप पाटील, कपिल पाटील, गंगाधर सोनवणे, नितीन ढोकने, सुनील गरूडकर, सुषमा पाटील आदी कर्मचारी हजर होते.मुख्याध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष एम. ए. पाटील, तुषार पाटील, प्रकाश पाटील, माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, टी. डी. एफ संघटनेचे सुशील भदाणे, शिक्षक भारतीचे आर. ज.े पाटील, जुनी पेन्शन योजना संघटनेचे प्रभूदास पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कैलास पाटील, सचिव सुनील चौक, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजय भाईदास पाटील, सचिव संजीव सैंदाने, विस्तार अधिकारी एल.डी. चिंचोरे, अनिल राणे आदींनी आपापल्या विभागाचे कर्मचारी संपावर असल्याचे सांगितले. तर देशभर मोबाईल दुकानदारांचा देखील बंद असल्याचे प्रितेश जैन, अतुल महाजन यांनी सांगितले.चाळीसगाव परिसरातील माध्यमिक शाळांचे कामकाज ठप्पचाळीसगाव तालुक्यात बुधवारी विविध संघटनांनी पुकारलेल्या संपाला चाळीसगाव परिसरात सकाळी ११ वाजेपर्यंत संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळ विभागात भरणा-या माध्यमिक शाळांमधील कामकाज संपामुळे ठप्प झाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टी दिल्याने शाळा काही तासात ओस पडल्या. बहुतांशी शाळांमधील शिक्षकांनी संपात सहभाग घेतला. शहरातील खासगी प्राथ. शाळांचे कामकाज सुरळीत सुरु होते. खासगी प्राथ. शाळांमधील शिक्षकांनी संपाला बाहेरुन पाठिंबा दिला असून काळ्या फिती लावून संपात सहभाग नोंदवला आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर मात्र संपाचा परिणाम दिसून आला.जि.प.व्यवस्थापनाच्या तालुक्यात १०९ प्राथ. शाळा असून या शाळांमधील शिक्षकांनी संपात सहभाग घेतलेला नाही. जि.प.च्या सर्व शाळा ११ ते पाच यावेळात भरतात. संघटनांनी संपात सहभाग घेतल्याचे लेखी पत्र दिले नसून ग्रामीण भागातील जि.प.शाळांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहिल. तालुक्यात ७२ माध्य. शाळा असून यातील बहुतांशी शाळांमधील शिक्षक संपात सहभागी झाले असल्याची माहिती प्र.गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी दिली.महसूल, पं.स.कर्मचारीही संपात सहभागीपंचायत समिती व महसुल विभागातील कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता 'लोकमत' प्रतिनिधीने कार्यालयांमध्ये फेरफटका मारला असता कर्मचा-यांची कमी उपस्थिती दिसून आली. संपात किती कर्मचारी सहभागी झाले याचा आढावा घेण्यात आहे. अशी माहिती नायब तहासिलदार विशाल सोनवणे व गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी दिली. दरम्यान शिक्षक संघटनांसह तलाठी संघटनेनेही संपाला प्रतिसाद दिला आहे.जिल्ह्यातील ग्रामसेवकांचा संपात शंभर टक्के सहभागजिल्ह्यातील ९७४ ग्रामसेवकांनी संपात शंभर टक्के सहभाग नोंदवला आहे. यामुळे ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. आम्ही पूर्णपणे संपात सहभागी झालो आहोत. अशी माहिती ग्रामसेवक संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम यांनी दिली.मुक्ताईनगर तालुक्यात शिक्षक संपात सहभागी झाले आहेत. रावेरला पं.स. कृषी विभाग, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना, महसूल कर्मचारी संघटना संपावर असून उर्वरीत पं.स. कार्यालय, जि. प. सिंचन व बांधकाम, सार्वजनिक बांधकाम, तालुका कृषी कार्यालय सुरळीत आहेत.बोदवड येथे अंगणवाडी सेविका तसेच प्राथमिक शाळा शिक्षक, तसेच बँक बंद आहेत. पारोळा तालुक्यात शाळा, तहसील कार्यालय कर्मचारी पंचायत समिती कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव