शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

भडगाव तालुक्यातील पांढरद फाट्यावर एसटी बसेस रोखल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 16:45 IST

तालुक्याच्या ठिकाणावरुन गिरणा काठालगतच्या पांढरद येथे सुरू असलेल्या एसटी बसेस या नेहमीच उशिराने धावतात. यामुळे बुधवारी दुपारी संतप्त झालेल्या विद्यार्थी व ग्रामस्थांनी एरंडोल-येवला राज्यमार्गावरील फाट्यावर एसटी बसेस अडविल्या.

ठळक मुद्देअनियमित बससेवा भडगावी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानभडगाव स्थानकप्रमुखांवर रोष

खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : तालुक्याच्या ठिकाणावरुन गिरणा काठालगतच्या पांढरद येथे सुरू असलेल्या एसटी बसेस या नेहमीच उशिराने धावतात. यामुळे बुधवारी दुपारी संतप्त झालेल्या विद्यार्थी व ग्रामस्थांनी एरंडोल-येवला राज्यमार्गावरील फाट्यावर एसटी बसेस अडविल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करीत बससेवा सुरळीत केली.यासंदर्भात वृत्त असे, की पांढरद येथे भडगाव येथून पाचोरा आगाराच्या चार बसफेºया सुरू आहेत. सकाळी सातला, अकराला, दुपारी एकला व सायंकाळी साडेपाच असे वेळापत्रक आहे. असे असताना शालेय वेळेत असणारी अकराची बस ही उशिरात उशिरा बारा वाजता गावी येते. याचप्रमाणे सायंकाळची बस वेळेपेक्षा आधी भडगाव येथून सोडण्यात येते. त्यामुळे एकतर विद्यार्थ्यांच्या तासिका बुडतात. नाहीतर ८-१० कि.मी. पायी भडगावहून पांढरदला यावे लागते. कधी -कधी सायंकाळची बस रात्री येते. जवळजवळ ५०-६० मुले व मुली भडगावी शिकतात. बुधवारी एसटी बसची अकराची वेळ होऊनही ती न आल्याने संतप्त विद्यार्थी, ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ यांनी दोन कि.मी.वर फाट्यावर येत प्रथम आडळसे-भडगाव बस अडवली. यानंतर उशिरा आलेली पांढरद बसदेखील रोखली. पोलिसांना खबर लागल्यानंतर त्यांनी पांढरद फाट्यावर येत बससेवा सुरळीत केली. ग्रामस्थांशी चर्चा केली. यानुसार जिल्हाधिकारी, तहसीलदार, भडगाव पोलीस स्टेशन, पाचोरा आगार व भडगाव स्थानक प्रमुखांना निवेदने दिली.दरम्यान, ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे, की पांढरद येथील एसटी बसेस या अनियमित धावतात. कधी-कधी बसफेरी मनमानीपणे बंद करण्यात येतात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर ग्रामस्थांची गैरसोय होते. वरील दिलेल्या वेळेत बसफेºया नियमीत सुरु न झाल्यास २९ जुलै रोजी तहसील कचेरीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.भडगाव स्थानकप्रमुखांवर रोष‘लोकमत’ प्रतिनिधीने पांढरद फाट्यावर या विद्यार्थ्यांची भेट घेतली. बसेस वेळेवर धावत नसल्याने, याविषयी बस केव्हा लागणार? आदी चौकशी भडगाव स्थानकप्रमुखांकडे करावी तर ते पहिल्याच झटक्यात उडवून लावतात. व्यवस्थित उत्तर किंवा समाधान करीत नाहीत. असंबद्ध बोलतात, असा एकूणच मोठा रोष विद्यार्थिनी, विद्यार्थी व पालकवर्गाचा दिसून आला. बस अडवून झाल्यानंतर भडगाव पोलिसात आज हे विद्यार्थी निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांनी वरील प्रकार सांंिगतला. मात्र पोलीस भडगाव स्थानक प्रमुखांकडे हे जाणून घेण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी तेथून आधीच काढता पाय घेतल्याने पोलीस माघारी आल्याचे ग्रामस्थांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यांना नंतर बोलावणार असल्याची माहिती ुमिळाली.

टॅग्स :MSRDCराज्य रस्ते विकास महामंडळBhadgaon भडगाव