शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत जळगाव-पुणे दरम्यान लालपरी सुसाट धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2023 19:56 IST

भूषण श्रीखंडे  जळगाव : दिवाळीत पुणे- जळगाव या मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता जळगाव एसटी विभागाने दिवाळीसाठी नियमित ...

भूषण श्रीखंडे 

जळगाव: दिवाळीत पुणे-जळगाव या मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता जळगाव एसटी विभागाने दिवाळीसाठी नियमित गाड्यांसह जादा बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे. यात शिवशाही, साधी परिवर्तन, शयनआसनी गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सचे दिवाळी सणामध्ये अव्वाचे सव्वा वाढलेले भाडे तसेच रेल्वेचे आरक्षण फुल्ल असल्याने प्रवाशांना एसटी बसचा आरामदायी व सुरक्षित प्रवासाचा पर्याय जळगाव एसटी विभागाने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी दिवाळीत जादा बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

दीपोत्सवामध्ये दिवाळी सण तसेच भाऊबीज साजरा करण्यासाठी जळगाववरून पुण्याला तर पुण्यावरून जळगावला येणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. प्रवाशांच्या मागणीनुसार जळगाव एसटी विभागाने दिवाळीमध्ये प्रवाशांसाठी जळगाव ते पुणे व पुणे ते जळगाव असे नियमित फेऱ्यांसह जादा बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंगची देखील सुविधा एसटी विभागाने खुली करून दिली आहे.

ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधादिवाळीत नियमित व जादा बसगाड्यांसाठी एम.एस.आर.टी.सी या रिझर्व्हेशन ॲप वरून तसेच रेडबस, पेटीएम, अभीबस या मोबाईल ॲपवरून ऑनलाईन आरक्षण उपलब्ध केले आहे.

अजून बस फेऱ्या वाढविल्या जातीलजळगाव एसटी विभागाने दिवाळी निमित्त जळगाव येथून पुण्याला जाण्यासाठी तर पुण्यावरून जळगावला येणाऱ्या बसेसची आरक्षण सुविधा केली आहे. या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यावर एसटी विभागाकडून अजून बसफेऱ्या वाढविल्या जाणार आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव