शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे श्रीरामजन्मोत्सव सोहळ्य़ाचा अपूर्व उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 13:11 IST

प्रभू श्रीरामाच्या जयघोषणानी दुमदुमली जळगावनगरी

ठळक मुद्देमंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा मंदिरांमधून टाळ-मृदुंगाचे मंगल सूर

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 25 - ‘सियावर रामचंद्र की जय’चा एकच जयघोष अन् ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला’ म्हणत रामजन्माचा दिव्यसोहळा रविवारी दुपारी जळगाव येथे मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभू रामचंद्र यांच्या दर्शनासाठी अबालवृद्धांनी प्रचंड गर्दी केली होती.श्रीराम नवमीनिमित्त शहरातील श्रीराम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. मंदिरांमधून टाळ-मृदुंगाचे मंगल सूर ऐकू येत होते. जुने जळगाव परिसरातील श्रीराम मंदिर व नवीन बसस्थानक परिसरातील चिमुकले राममंदिरासह इतर मंदिरांमध्ये भक्तीमय वातावरण होते.जुन्या गावात भाविकांची प्रचंड गर्दीजळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानात राम नवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिरात रामनवमी निमित्त रामसेतूची शिळा दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. तिचे दर्शन करण्यासाठीही गर्दी झाली होती. पहाटे ४ वाजता भजन, काकडा आरती, महाभिषेक तसेच सकाळी ७ वाजता मंगल आरती, साडेदहा वाजता गंगाधर महाराज यांचे कीर्तन होऊन दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टीने रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.२२२चिमुकले राम मंदिरात राम नामाचा गजरशहरातील मध्यवर्ती भागातील नवीन बसस्थानकासमोरील चिमुकले राम मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त सकाळी साडेपाच वाजता मंगल आरती, ६ वाजता अभिषेक, साडेसात वाजता आरती, सकाळी १० वाजता हभप दादा महाराज यांचे रामजन्मावर कीर्तन झाले तर ‘पुरोहितांची परंपरा’ या विषयावर ऋषीकेश जोशी, राजेश जोशी, हेमंत धर्माधिकारी यांचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी १२ वाजता जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते आरती झाली. या वेळी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्रीराम जन्मोत्सवानंतर पाळण्यातील श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रीरामाचे दर्शन घेऊन भाविकांनी दादा महाराज जोशी यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी आमदार सुरेश भोळे यांनीही भेट देऊन दर्शन घेतले.श्रीराम जन्मोत्सवासाठी मंदिरात केळीचे खांब, आंब्याच्या पानांचे तोरण, फुलांच्या माळा व आकर्षक रोशणाईने मंदिर सजवण्यात आले होते. पाळण्याला पान, फुलं, फुगे, यांनी सजविण्यात आले होते. शहरातील अनेक महिला-पुरुष भाविकांनी रामजन्मोत्सवासाठी मंदिरात सकाळी ११ वाजेपासून गर्दी केली होती व राम नामाचा गजराने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमला होता. जन्मोत्सवानंतर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Jalgaonजळगाव