शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा : श्री भगवान पांडूरंग, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ पालखींचे मुक्ताईनगरकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 12:55 IST

पंढरपूर येथून साक्षात श्री पांडूरंग परमात्मा पादुका मंगळवारी मुक्ताईकडे निघाल्या

ठळक मुद्देश्री. पांडूरंग दिंडी सोहळा औरंगाबाद मुक्कामीसंत नामदेव महाराज व त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ पादूका पालखी दिंडी सोहळेदेखील मुक्ताईनगरकडे

आॅनलाइन लोकमतमुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. ८ - श्री संत मुक्ताई ७२१वा अंतर्धान समाधी सोहळा १० रोजी श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे साजरा होणार असून यानिमित्ताने सोहळ््यात सहभागी होण्यासाठी परंपरेने पंढरपूर येथून साक्षात श्री पांडूरंग परमात्मा पादुका मंगळवारी मुक्ताईकडे निघाल्या आहेत. बुधवारी भगवान पाडुरंगाच्या पादुका दिंडी सोहळा दुपारी जामनेर तर सायंकाळी भुसावळ येथे दाखल होणार आहे.संत नामदेव महाराज व त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ पादूका पालखी दिंडी सोहळेदेखील मुक्ताईनगरकडे येत आहेत. काल पंढरपूर येथे विधीवत पूजन करून श्री. पांडूरंग दिंडी सोहळा पहिल्या औरंगाबाद मुक्कामी आला. मंगळवारी हा सोहळा औरंगाबाद येथून मुक्ताईनगर कडेप्रस्थान झाला असूने सोहळ्यात मुक्ताई फडासह अनेक वारकरी सामील झालेले आहेत.जामनेरात आज पांडुरंग परमात्मा पादुकाऔरंगाबाद येथून निघालेल्या श्री पांडूरंग परमात्मा पादुका दिंडी सोहळा व संत नामदेव महाराज पालखी भेट सोहळा जामनेर येथे बुधवार ९ रोजी दुपारी १२ वाजता रंगणार आहे. यावेळी सोहळ्याचे नगराध्यक्षा साधना महाजन सह स्थानिक परिसरातील वारकरी स्वागत करतील. सावता महाराज मंदिरात भाविक दर्शनासाठी विसावा होईल. जामनेर वरून श्री संत नामदेव महाराज दिंडी सोहळा बोदवड मार्गे मुक्ताईनगर येथे सायंकाळी दाखल होईल.भुसावळात पांडुरंग पादुका मुक्कामीजामनेर येथून श्री पांडूरंग पालखी सोहळा भुसावळ कडे रवाना होवून ठिकठिकाणी स्वागत स्वीकारून जामनेर नाका भुसावळ येथे पांडूरंग व संत निवृत्तीनाथ दिंडी भेट सोहळा संध्याकाळी ५ वाजता होईल. नगराध्यक्ष रमण भोळे, विठ्ठल मंदिर वार्डाचे विश्वस्त, झेंडूजीमहाराज बेळीकर गादीपती भरत महाराज पाटील पालखी पूजन करतील भुसावळ शहरातून मिरवणुकीने दोन्ही सोहळे विठ्ठल मंदिरात दाखल होतील येथेच पांडुरंग पादुका मुक्काम होईल तसेच संत निवृत्तीनाथ पादूक पालखी सोहळा वरणगाव मुक्कामी रवाना होईल.गुरुवार १० रोजी मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा निमित्ताने संत नामदेव महाराज यांचे विद्यमान १६ वे वंशज यांचे पुष्पवृष्टीचे कीर्तन दु.११ ते दीड दरम्यान होईल या सोहळ्यात अनेक संस्थानाचे विश्वस्त भाविक उपस्थित राहतील.भुसावळ जामनेरच्या नागरिकांनी दिंडी पालखी सोहळ्यात सहभागी होवून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठल मंदिर वार्ड विश्वस्त मंडळाने केले आहे. पंढरपूर येथून पांडुरंग पादुका सोहळा प्रस्थान होताना विठ्ठल रुख्मिणी समिती चे विभाग प्रमुख संभाजी देवकर , व्यवस्थापक बालाजी पुडलवाड, शकुंतला नडघीरे, श्री संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष रवींद्र पाटील व मुक्ताई संस्थांचे विश्वस्त पंजाबराव पाटील मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे , पालखी सोहळा पत्रकार संघ अध्यक्ष सूर्यकांत भिसे, जयवंतराव महल्ले, सम्राट पाटील आदी उपस्थित होते तर सोहळ्या सोबतच मान्यवर मुक्ताईनगर येत आहे.

टॅग्स :Muktainagarमुक्ताईनगरJalgaonजळगाव