शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जोडीदार कोणत्याही समाजाचा चालेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 22:05 IST

परिचय मेळावा : भंडारा येथून आलेल्या युवतींनी व्यक्त केली अपेक्षा

जळगाव : विवाहासाठी जोडीदार कोणत्याही समाजाचा चालेल फक्त तो निर्व्यसनी असावा. शेतकरी जोडीदारही चालेल, अशा अपेक्षा भंडारा येथून आलेल्या युवतींनी रविवारी आयोजित परिचय मेळाव्यात व्यक्त केल्या. त्यावेळी उपस्थितही आवक झाले.तोताराम महाराज नवचैतन्य लेवा पाटीदार समाज मंडळ जळगावतर्फे शेतकरी, व्यावसायिक व नोकरदारांसाठी रविवारी बाबा हरदासराम मंगल कार्यालयात युवक-युवती परिचय मेळावा झाला. त्यावेळी या मेळाव्यात भंडारा येथील विविध समाजाच्या मुलीही उपस्थित होत्या. मंडळातर्फे उपवर मुली व त्यांच्या पालकांनाच निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी मेळाव्यात आपला परिचय करुन दिला. त्यावेळी वरीलप्रमाणे अपेक्षा व्यक्त केल्या. विशेष म्हणजे असा परिचय मंचावरुन करुन देणाऱ्या बहुतांश मुली उच्च शिक्षित होत्या.जळगाव जिल्ह्यात जवळपास सर्वच समाजात विदर्भातून मुली सुना म्हणून आणल्या जात आहेत. परंतु यात काही मध्यस्थी करत असतात. असे विवाह जोडणे काही जणांचा व्यवसायच झालेला आहे, असे मत मान्यवरांनी मांडले.प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, राजेंद्र राणे, यतीन ढाके, धनराज महाराज, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ जळगावचे रामभाऊ पवार, संजय मराठे, उज्ज्वल चौधरी, लालजी पाटील, अशोक पाटील, अ‍ॅड. प्रकाश पाटील, प्रल्हाद भारंबे,अमर शहीद संत कवराम ट्रस्ट जळगाव , समाजाच्या विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.तसेच भंडारा येथील हरिश्चंद्र बांडेबुचे, देविदास सूर्यवंशी, कार्तिक लांजेवार, अमित उरफुडे, कुंवरलाल बहेकर यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वधू-वर सूचीचे प्रकाशन करण्यात आले.यशस्वीतेसाठी मणिकर्णिका महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक मंडळ, युवक मंडळ , शक्ती महाजन, शशिकांत फेगडे, किशोर कोलते, निता वराडे, पूनम सावदेकर, सीमा फेगडे, वैशाली बºहाटे, वैष्णवी भंगाळे, प्रशांत महाजन, अर्चना भंगाळे, शिशीर भंगाळे, कविता कोलते, मयूर लोखंडे, माधुरी लोखंडे, होमाजी भंगाळे, वसंत कोलते, योगेश फेगडे, स्वप्निल खडसे यांसह समाजबांधवांनी परिश्रम घेतले.या मेळाव्यास जळगाव जिल्ह्यासह, नाशिक, मुंबई, पुणे, जालना, औरंगाबाद, निपाणा , मलकापूर, सुरत, वापी, इंदूर आदी ठिकाणाहून समाजबांधव आले होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव