शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

अमळनेर येथे लसीकरणासाठी बालकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 18:15 IST

अमळनेर तालुक्यातील २११ शाळांमधील सुमारे ३० हजार मुलांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले आहे. पालकांसह विद्यार्थ्यांमध्येही उत्साह दिसून येत आहे.

ठळक मुद्दे३० हजार बालकांना झाले लसीकरणअमळनेर तालुक्यात २६४ शाळा असून, ८० टक्के लसीकरण झाले आहे.आश्रमशाळेत मात्र गैरहजेरीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त

अमळनेर, जि.जळगाव : अमळनेर तालुक्यातील २११ शाळांमधील सुमारे ३० हजार मुलांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले आहे. पालकांसह विद्यार्थ्यांमध्येही उत्साह दिसून येत आहे. आश्रमशाळांमध्ये मात्र विद्यार्थी गैरहजर राहिल्याने तेथील प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी दिसून आले आहे. विद्यार्थ्यांचे स्थलांतर झाले आहे.अमळनेर तालुक्यात २६४ शाळा असून, ८० टक्के लसीकरण झाले आहे. ग्रामीण भागातील पालकांमध्ये निरुत्साह असला तरी विद्यार्थी मात्र आनंदाने लसीकरण करून घेत आहेत. शहरात मात्र पालक स्वत: मुलांसोबत जाऊन शाळेत लसीकरण करून घेत आहेत, जे मुले गैरहजर आहेत त्यांना दुसऱ्या टप्प्यात पुन्हा शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. शाळेतील मुलांच्या लसीकरणांनातर अंगणवाड्यांंमध्ये सहा वर्षे वयापर्यंतच्या मुलांना देण्यात येईल व जी लहान मुले अंगणवाड्यात नाहीत अशा बालकांनाही अंगणवाड्यांमध्ये बोलावून लसीकरण केले जाणार आहे. मुख्याध्यापक, शिक्षक, समाजसेवक, सर्वांचे चांगले सहकार्य मिळत आहे.लसीकरणाच्या पथकात ५८ आरोग्यसेविका, १० पर्यवेक्षक, २२ आरोग्य सेवक, १७९ आशा कार्यकर्त्या, २७० अंगणवाडी सेविका, सहा परिचारिका यांची नियुक्ती केली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप पोटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.गिरीश गोसावी (ढेकू), डॉ.चंदन पवार (मांडळ), डॉ.प्रशांत कुलकर्णी (मारवाड), डॉ.सुरेखा हिरोळे, डॉ.नीलिमा देशमुख (पातोंडा), डॉ.संजय रनालकर (जानवे), डॉ.विसावळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताळे , डॉ.जी.एम.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली न.पा.रुग्णालयाचे डॉ.विलास महाजन, डॉ.राजेंद्र शेलकर आदी विविध प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक प्रमुख परिश्रम घेत आहेतपहिली ते दहावीपर्र्यंत शाळांमधील ८० टक्के लसीकरण झाले आहे. १२ मुलांना किरकोळ परिणामाव्यतिरिक्त कोणालाही गंभीर दुष्परिणाम झालेले नाहीत. खासगी डॉक्टरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.-डॉ.दिलीप पोटोडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, अमळनेरशासनाने मोफत गोवर रुबेला लस उपलब्ध करून दिल्याने गरिबांचे पैसे वाचले आणि मुलांच्या भविष्यातील आरोग्याची हमी मिळाली आहे.- परवेज शेख, अमळनेरज्याप्रमाणे शासनाने गोवर रुबेला लसीकरण मोफत उपलब्ध केले त्याचप्रमाणे निमोनिया आणि डायरियाच्या लसीदेखील सुमारे तीन हजार रुपयांला पडतात, त्याही शासनाने मोफत उपलब्ध केल्यास बालमृत्यू थांबविण्यात यश मिळेल.-अ‍ॅड.तिलोत्तमा पाटील, नागरिक, अमळनेरसामूहिक एकाच वेळी लसीकरण होत असल्याने सर्व विद्यार्थी हसत खेळत लस घेत आहेत. मोजके विद्यार्थी घाबरत आहेत. एकमेकांचे पाहून प्रतिसाद चांगला मिळाला.-पी.बी.पाटील, मुख्याध्यापक, अमळनेरगोवर रुबेला लस दिल्याने मुलींच्या संभाव्य रुबेलावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य आहे, तर गोवरचे समूळ निर्मूलन करून बालमृत्यू थांबवता येणार आहे. यातून बालकांना संरक्षण मिळेल.- डॉ.जी.एम.पाटील, बालरोगतज्ज्ञ, अमळनेर 

टॅग्स :Healthआरोग्यAmalnerअमळनेर