शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:15 IST

जळगावकरांना सलाम : रस्ते, विविध चौक निर्मनुष्य, बाजारपेठ कडकडीत बंद, बसची चाकेही थांबली, हॉटेल-लॉजही ओस औद्योगिक वसाहतीमध्ये शुकशुकाट, संयम व संकल्पपूर्तीचे दर्शन

जळगाव : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी रविवार, २२ मार्च रोजी पाळण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कडकडीत बंद पाळत ‘कोरोना’ला रोखण्यासाठी आपली एकजूट दाखवून दिली. ‘जनता कर्फ्यू’ला भरघोस प्रतिसाद देत शहरवासीयांनी ‘न भूतो....’ असा बंद पाळला. यामुळे शहरातील रस्ते, विविध चौक सकाळापासूनच सामसूम होते. रस्त्यावर केवळ पोलीस आणि अत्यावश्यक सेवा देणारी मंडळीच असल्याने सर्वत्र शांतता पसरली होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२ रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत नागरिकांनीच ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन केले. त्यास सर्वच स्तरातून पाठिंबा मिळण्यासह नागरिकांनी स्वत: सहभागी होत कोरोनाला हद्पार करण्याचा निर्धार केला व सर्वांनी घरात राहणे पसंत केले. यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते सामसुम होते. त्याचबरोबर बस स्थानक, रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट होता.

बाजारपेठ कडकडीत बंदव्यापारनगरी असलेल्या जळगावातील बाजारपेठाच बंद ठेवण्याचा निर्णय विविध व्यापारी संघटनांनी घेतला व तो प्रत्यक्षात उतरवूनदेखील दाखविला. तसेच औद्योगिक वसाहत, विविध दुकाने, हॉटेल व इतर सर्व अस्थापना बंद ठेवून कोणीही घराबाहेर पडणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली. त्यामुळे नेहमी वर्दळ असलेले शहरातील महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट, बी.जे. मार्केट, सुभाष चौक परिसर, सराफ बाजार, दाणा बाजार इत्यादी प्रमुख व्यापारी ठिकाण पूर्णपणे बंद होती.

‘न भूतो.....’ असा कडकडीत बंदअनेक वेळा वेगवेगळ््या कारणांनी बंद पुकारण्यात येतो. त्याला कमी-अधिक प्रतिसाद मिळत असतो. मात्र सध्या कोरोनामुळे देशवासीयांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने स्वत:च्या कुटुंबासह देशवासीयांच्या आरोग्यासाठी सर्व जळगावकर एकवटले. त्यामुळे कोणीच बाहेर पडत नसल्याने शहरातील टॉवर चौक, चित्रा चौक, नेहरु चौक, रथ चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेट बँक चौक, कोर्ट चौक, काव्यरत्नावली चौक हे सर्व सामसूम होते. इतकेच नव्हे शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य होते. त्यामुळे शहरात सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत व त्यानंतर पुन्हा ५.०५ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वत्र शांतता होती.सहभाग कौतुकास्पदआदेश न देता जिल्हावासीयांनी जनता कर्फ्यूमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, हे कौतुकास्पद आहे. सुदैवाने जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण नाही, मात्र सर्वांना काळजी घेण्याबाबतचे गांभीर्य समजले असून यापुढेही सर्वांनी सहकार्य करावे. हे सर्वांचे हिताचे आहे.-डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारीजनतेचे कौतुकजनता कर्फ्यू चे पालन करुन जनता खरच कौतुकास पात्र ठरली आहे. यापुढचा काळ आणखी गंभीर असणार आहे. कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर जनतेने असेच सहकार्य करावे. एकजुटीने हा लढा उभारायचा आहे. हा जनता कर्फ्यू पहाटे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आला. आजपासून कलम १४४ लागू आहे.-डॉ.पंजाबराव उगले,पोलीस अधीक्षकदुपारच्या सुमारास मेडिकलही ‘लॉक’अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे़ शिवाय जनता कफ़र्युच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच सेवा ठप्प होत्या़ यात अनेक परिसरातील अनेक मेडिकल दुकाने बंद होते़ दुपारी चित्र बघितले असता संपूर्ण गांधी मार्केटमध्ये केवळ एकच मेडिकल सुरू होते़ नेहमीच्या औषधींशिवाय अत्यावश्यक असलेल्या रक्तदाब व मधुमेहाच्या औषधींसह मास्क व सॅनिटायझर घेण्यासाठी काही नागरिक दुकानावर गेले होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव