शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या बाहेरील कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST

कोरोनाबाबत रेल्वेतर्फे जनजागृती जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन ...

कोरोनाबाबत रेल्वेतर्फे जनजागृती

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच रेल्वे स्टेशनवरील आसने दररोज निर्जंतुक करण्यात येत आहे. प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बसविण्यात येत आहे.

केळकर मार्केटमध्ये अस्वच्छता

जळगाव : जिल्हा परिषदेजवळील केळकर मार्केटमध्ये अनियमित साफसफाईअभावी अनेक ठिकाणी कचरा साचला आहे. यामुळे व्यावसायिकांना व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

महाराष्ट्र एक्स्प्रेसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद

जळगाव : गेल्या आठवड्यापासून पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. जळगावहून दररोज पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तसेच रेल्वे पाठोपाठ पुण्याकडे जाणाऱ्या महामंडळाच्या बसेसलाही अल्प प्रतिसाद असल्याचे सांगण्यात आले.

चाळीसगाव मार्गावर शिवशाही बस सुरू करण्याची मागणी

जळगाव : सध्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सेवा बंद असल्यामुळे नागरिक महामंडळाच्या बसेसने पाचोरा व चाळीसगाव येथून ये-जा करीत आहेत. मात्र, या मार्गावर साध्या बसेस चालविण्यात येत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी जळगाव आगार प्रशासनाने या मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.