शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संतांचे संगती मनोमार्ग गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:34 IST

आजच्या युगात प्रत्येक मनुष्य बेचैन आहे. मनुष्य सुखी होण्याऐवजी दु:खीच होत चालला आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात बरेच चांगले वाईट ...

आजच्या युगात प्रत्येक मनुष्य बेचैन आहे. मनुष्य सुखी होण्याऐवजी दु:खीच होत चालला आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात बरेच चांगले वाईट अनुभव येतात. चढ उतार येतात, मान-अपमानही होतो. यामुळे आपल्या मनावर एक प्रकारचे कुविचाराचे मळभ साठते ते घालवण्यासाठी, मनाला पवित्र, निर्मळ व सुंदर बनविण्यासाठी एकच उपाय म्हणजे सत्संग...! स्वर्गीय सुख प्राप्त होते फक्त सत्संगात. हो इथेच संतांचे अनमोल विचार ऐकायला मिळतात, ज्याप्रमाणे परिस्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे, चंदनाच्या सान्निध्यात उगवणाऱ्या साधारण वनस्पतीला चंदनाचा सुगंध यावा किंवा नदी सागराला मिळून सागर स्वरूप होऊन जावी त्याप्रमाणे सत्संगामध्ये सदगुरूंच्या स्पर्शाने जीवनाचे सोनं होत, मनाला एक नवसंजीवनी प्राप्त होते. सत्संग या शब्दाचा अर्थ होतो संताची संगत, सत्संग हे एक आध्यात्मिक मंदिर असून मानवी जीवनाला आत्मिक सुख देणारं एक ज्ञानाचं परिपूर्ण भांडार आहे. पुरातन काळापासून संतांनी अभंगवाणीतून, ग्रंथातून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी सत्संगाची महती गातात.संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात... संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।बाबा अवतारसिंहजी म्हणतात.संगत मिळेल जर साधुची कलंक सारे होती दूर ।संगत मिळेल जर साधुची मन आनंद होईल चूर ।म्हणूनच संतांच्या संगतीमुळेच ब्रह्मज्ञान प्राप्त होते. म्हणतात संत, गुरू, परमात्मा तीनो बडे महान, संत मिलावे गुरूसे, गुरू मिलोवे राम...।सत्संगामध्येच भक्त आणि भगवंत यांचे पवित्र नाते जोडण्याचे कार्य घडते. दानवाचे मानवात आणि मानवाचो देवात रूपांतर करण्याचे महत्वाचे कार्य सत्संग करते. मानवतेचा आधार, सुखी जीवनाचा मंत्र, आनंदाचे प्रफुल्लीत झालेली एक बाग, पुण्याची पुण्यभूमी, समाधानाचे मंदिर, विवेकाचा खजिना म्हणजे संतांची संगत.संकलन - राजकुमार वाणी, ज्ञानप्रचारक, संत निरंकारी मंडळ, जळगाव.

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव